IPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही

  टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे. 

IPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही  title=

हैदराबाद :  टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे. 

2009 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात शतक केलेल्या या खेळाडूला जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. पांडेने आयपीएलच्या दुसऱ्या सिझनमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. मात्र याच्या सहा वर्षानंतर 2015 मध्ये झिमाब्वेमध्ये भारताला टी 20 आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण करण्याची संधी दिली. 

मनीष पांडेने काय म्हटलं ?

मनीष पांडे म्हणाला की, 2009 मध्ये पहिलं शतक करून सुरूवात केली. 2014 मध्ये चांगला खेळ खेळल्यामुळे हे वर्ष लक्षात राहिलं आहे. मी झिमाब्वेमध्ये 2015 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं. 

पांडे पुढे असं म्हणाला की, 2009 -10 नंतर मी असा विचार करत होतो भारतासाठी खेळेन. आयपीएलच्या प्रथम श्रेणीतील सत्रात खेळण देखील चांगल राहिलं आहे. मी भारतासाठी खेळण्यास आतुर आहे. मात्र असं झालं नाही त्यामुळे ते निराश झालो आहे. आणि आता मी शिकलो आहे की हेच जीवन आहे. 

मनीष पांडेला हैदराबादमध्ये 11 करोड रुपयाची बोली लावून आयपीएलच्या निलामीच्या दरम्यान जानेवारीमध्ये खरेदी केलं. मनीष पांडे 2014 मध्ये फायनलसाठी तो कोलकाताच्या विजयाचा नायक ठरला.