मुंबई : महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यातच मुंबईच्या टीमने देखील अनोख्या प्रकारे महाराष्ट् दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या टीममधील जेसन बेहरनडॉर्फला मराठी शिकवून त्याला काही वाक्य बोलायला लावली आहेत. बेहरनडॉर्फला मुंबईकर सूर्यकुमार यादवने मराठीचे धडे दिले आहेत. मराठीचे धडे देतानाचा व्हिडीओ मुंबई टीमच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
This #MaharashtraDay, how about an Aussie talking in Marathi? #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians @JDorff5 @surya_14kumar @ImRo45 pic.twitter.com/Mn7z47wqml
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2019
माझ नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो. कसं काय पलटन ? आणि लई भारी मुंबई. असे तीन वाक्य बेहरनडॉर्फ मराठीतून बोलला आहे. हे वाक्य बोलताना बेहरनडॉर्फची चांगलीच तारांबल पाहायला मिळाली. वरील वाक्य बोलल्यानंतर तो आपल्या कॅप्टन रोहित शर्माकडे गेला. बेहरनडॉर्फने रोहित सोबत मराठीतून संवाद साधला.
सूर्यकुमारने शिकवलेल्या निवडक वाक्यांचा प्रयोग बेहरनडॉर्फने रोहित शर्मावर केला. 'मला सूर्यकुमारने शिकवलेले वाक्य आता मी रोहित बरोबर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे', असे म्हणत तो रोहितच्या दिशेने गेला. कसं काय रोहित म्हणत बेहरनडॉर्फने रोहितची विचारपूस केली. यावर रोहितने 'मजेत' असे हसत उत्तर दिले. या उत्तरावर बेहरनडॉर्फ रोहितला 'लई भारी' म्हणाला.
तु फार चांगली मराठी बोललास या शब्दात रोहितने बेहरनडॉर्फचे कौतुक केले. या कौतुकाचे श्रेय बेहरनडॉर्फने सूर्यकुमारला दिले. सूर्यकुमारने चांगल्या पद्धतीने मला मराठी शिकवलं असे तो म्हणाला. 'पुढच्या वर्षी जेव्हा तु परत येशील तेव्हा तु एक परफेक्ट महाराष्ट्रीयन व्यक्ती बनून येशील' असे देखीलल रोहित शर्माने बेहरनडॉर्फला म्हटलं.