कोलकाता : कोलकाताच्या होम ग्राउंडवर मुंबई-कोलकाता आमने सामने लढणार आहे. मुंबईने टॉस जिंकून फिल्डींगचा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच कोलकाता साठी महत्वाची असणार आहे. मुंबई विरुद्धचा पराभव म्हणजे प्ले-ऑफ स्पर्धेतून बाहेर, असे समीकरण असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोलकाता मुंबईचा पराभव करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Rohit Sharma calls it right at the toss and elects to bowl first against the @KKRiders at Eden Gardens.#KKRvMI pic.twitter.com/cIX0lCTdah
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2019
मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. मुंबईने आतापर्यंत ११ मॅच खेळल्या आहेत. यापैकी ७ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहचणासाठी ८ मॅचमध्ये विजय गरजेचा असतो. त्यामुळे मुंबई कोलकाताचा पराभव करुन प्ले-ऑफमधील प्रवेशाची निश्चिती करण्याचा मानस असेल.
कोलकाताचा याआधी खेळलेल्या सहा मॅचमध्ये सलगपणे पराभव झाला आहे. मुंबई आणि कोलकाता या टीममध्ये आतापर्यंत २३ मॅचमध्ये भिडले आहेत. यापैकी १८ मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्ध खेळतानाचा मुंबईचा रेकॉर्ड चांगला आहे.
कोलकाता अंकतालिकेत ७ व्या क्रमांकावर आहे. कोलकाताने ११ मॅच खेळल्या आहेत. यापैकी केवळ ४ मॅच जिकंण्यात त्यांना यश आले आहे. कोलकाता प्ले-ऑफमध्ये येण्याची शक्यता ही जर-तरची आहे. पंरतु दिल्लीने बंगळुरुचा पराभव केल्याने कोलकाताची प्ले-ऑफ मधील प्रवेशाची शक्यता कायम आहे.
मुंबईने चेन्नई विरुद्ध २६ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये ४६ रनने पराभव केला होता. त्यामुळे मुंबईचा विश्वास नक्कीच वाढलेला आहे. चेन्नई विरुद्ध कॅप्टन रोहित शर्माने ६७ रन केल्या होत्या. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये रोहित कडून चांगल्या खेळीची अपेक्षा मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
मुंबईच्या बॉलर्सपुढे कोलकाताच्या स्फोटक आंद्रे रसेलला रोखण्याचे आव्हान असणार आहे. आंद्रे रसेल यंदाच्या आयपीएलच्या सुरुवाती पासून अष्टपैलू कामगिरी करत आहे. तसेच 25 एप्रिलला राजस्थान विरुद्ध दिनेश कार्तिकने ९७ रनची खेळी केली होती. त्यामुळे रसेल- कार्तिक जोडीला लवकर आऊट करण्याचे आव्हान मुंबईच्या बॉलर्ससमोर असणार आहे.
मुंबईकडे रोहित शर्मा, पांड्या बंधू तसेच किरॉन पोलार्ड यांच्या सारखे स्फोटक खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहेत. यांच्यावर मुंबईच्या बॅटिंगची जबाबदारी असणार आहे. तर जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा सारखे फास्टर बॉलर आहेत. तर स्पिन बॉलिंगची जबाबदारी ही कृणाल पांड्या आणि राहुल चहार यांच्या खांद्यावर असणार आहे.
मुंबई टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, एविन लेविस, सूर्यकूमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह आणि बंरिदर सरन
कोलकाता : दिनेश कार्तिक (कॅप्टन), क्रिस लिन, सुनील नारायण, रिंकू सिंह, रॉबिन उथप्पा, शुभमन गिल, नीतीश राणा, आंद्रे रसेल, पीयूष चावला, हैरी गुर्ने आणि संदीप वॉरियर.