आयपीएल 2019 | राजस्थानचा मुंबईवर ५ विकेटने विजय

राजस्थानचा कॅप्टन स्टीव स्मिथने सर्वाधिक नॉटआऊट ५९ रन केल्या.

Updated: Apr 20, 2019, 08:07 PM IST
आयपीएल 2019 | राजस्थानचा मुंबईवर ५ विकेटने विजय title=

जयपूर : राजस्थानने मुंबईचा ५ विकेटने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या १६२ रनचे आव्हान राजस्थानने ५ विकेट गमावून पूर्ण केले. राजस्थानचा कॅप्टन स्टीव स्मिथने सर्वाधिक नॉटआऊट ५९ रन केल्या. तर रियान परागने  ४३ रनची निर्णायक खेळी केली. 

 

मु्ंबईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचे पाठालाग करताना राजस्थनाची आश्वासक सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी अंजिक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी ३९ रन जोडल्या. अंजिक्य रहाणेच्या रुपात राजस्थानला पहिला झटका लागला. रहाणेने १२ रन केल्या. यानंतर आलेल्या स्टीव स्मिथच्या जोडीने संजू सॅमसनने चांगली खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ रन जोडल्या. यानंतर राजस्थानचा स्कोअर ७६ असताना संजू सॅमसन ३५ रनवर आऊट झाला. त्याला राहुल चहरने माघारी पाठवले.  चहरने याच ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर बेन स्टोक्सला भोपळा देखील फोडू दिला नाही. चहरने  स्टोक्सला बोल्ड केले.

स्टोक्स आऊट झाल्यानंतर मैदानात रियाग पराग आला. रियाग आणि स्टीव्ह स्मिथने राजस्थानच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७० रनची महत्वपूर्ण पार्टनरशीप केली. या जोडीला तोडण्यास कटिंगला यश आले. त्याने  रियाग परागला चोरटी धाव घेताना रनआऊट केले. परागने ४३ रन केल्या. रियाग आऊट झाल्यानंतर पुढील ओव्हरमध्येच मैदानात आलेल्या एश्टन टर्नरला बुमराहने पहिल्याच बॉलवर एलबीडबल्यू केले.

शेवटच्या टप्प्यात मॅच असताना राजस्थानने आपले विकेट गमावले. परंतू स्टीव्ह स्मिथने आपली कॅप्टनची खेळी करत विजय मिळवून दिल्या. स्टीव्ह स्मिथने नॉटआऊट ५९ रन केल्या. यामध्ये ५ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.

मुंबईकडून सर्वाधिक ३ विकेट राहुल चहरने घेतल्या. तर १ विकेट ही  जस्प्रीत बुमराहने घेतली.

याआधी राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या मु्ंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १६१ रन केल्या. मुंबईकडून सर्वाधिक ६५ रन क्विंटन डी कॉकने केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने ३४ रनची आश्वासक खेळी केली. राजस्थान कडून श्रेयस गोपाळने २ विकेट घेतल्या. तर स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर आणि जयदेव ऊनाडकटने प्रत्येकी १ विकेट घेतली.