India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या पुण्यात दुसरी कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉन्वे (Devon Conway) खेळत असताना डीआरएस घ्यायचा की नाही यासंदर्भात चर्चा सुरु होती. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं मत एकमेकांच्या अगदी विरोधात होतं. विराट कोहलीने रवींद्र जाडेजाला डीआरएस घेऊ नये यासाठी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण रोहित शर्माने त्याचं न ऐकता डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. याची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली, कारण विराटचं म्हणणं योग्य ठरलं. अम्पायर्सनी आपला निर्णय कायम ठेवला.
पहिल्या डावातील 25 व्या ओव्हरमध्ये हे सगळं घडलं. आर अश्विनने वील यंगला बाद केल्यानंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आला होता. त्याने कॉन्वेला चेंडू टाकल्यानंतर सर्वांनी पायचीत झाल्याबद्दल अपील केली. पण चेंडू फार वळत असल्याने अम्पायरने नॉट आऊट दिलं. पण तिथे जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं मत वेगळं होतं. खासकरुन सरफऱाज खान आणि ऋषभ पंत ज्यांनी यंगच्या विकेटमध्ये मोलाची भूमिका निभावली होती.
या सर्व खेळाडूंमध्ये फक्त विराट कोहलीचं मत वेगळं होतं. चेंडू स्टम्पवर जात नसल्याची विराट कोहलीला खात्री होती. विराट कोहली रोहित शर्माकडे डीआरएसबद्दल बोलण्यासाठी गेला होता. पण तोपर्यंत रोहित शर्माने निर्णय घेतला होता. त्याने अम्पायरला डीआरएससाठी इशारा दिला. पण अखेर हा रिव्ह्यू वाया गेला. समालोचन करणाऱ्या सायमन यांनीही 'रोहित, कम ऑन. घेऊ नकोस, पाय मिस होतोय', असं सांगत रोखण्याचा प्रयत्न केला. पण हा आवाज काही रोहितपर्यंत जाण्याचा संबंधच नव्हता.
भारताने जेव्हा डीआरएस घेतला होता, तेव्हा कॉनवे 38 धावांवर होता. यानंतर त्याने अर्धशतक केलं. त्याने 11 चौकार लगावले आणि 141 चेंडूत 76 धावा केल्या. अखेर आर अश्विनने त्याला बाद केलं. न्यूझीलंड संघ भक्कम स्थितीत होता. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला 259 धावांवर रोखलं. वॉशिंग्टन सुंदरने एकूण 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडचा अख्खा संघ तंबूत धाडला.
न्यूझीलंड विरुद्ध गोलंदाजी करताना आर अश्विनने प्रथम 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत आपला प्रभाव पडला. सुंदरने एका मागोमाग एक 7 विकेट्स घेऊन न्यूझीलंडच्या अर्ध्याहून अधिक टीमला लोळवलं. वॉशिंग्टन सुंदरने पहिले रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल यांना बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने एक तब्बल 7 विकेट्स घेतल्या आणि यामुळेच न्यूझीलंडला 259 धावांवर रोखणं टीम इंडियाला शक्य झालं.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.