कराची : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. विराटच्या या निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्यावर माजी क्रिकेटर्सकडून टीका होत आहे. त्यात आता पाकिस्तानच्या एका खेळाडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठं विधान केले आहे. या विधानाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर इमाम-उल-हकची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत इमाम-उल-हकने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे. रोहित शर्माकडे जे टॅलेंट आहे ते विराट कोहलीकडे नाही, असं इमाम-उल-हक म्हणताना दिसतोय.
पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत इमाम-उल-हक विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल म्हणाला की, 'मला वाटते की अल्लाहने रोहित शर्माला जी प्रतिभा दिली आहे, ती विराट कोहलीला दिली नसावी, असे त्याने म्हटलंय.तसेच मी दोघांना खेळताना पाहिलं आहे, रोहित शर्मा खेळतो तेव्हा रिप्ले चालू असल्याचं वाटतं, असं म्हणतं त्याने रोहितचे कौतूक केले.
Imam Ul Haq about @ImRo45
pic.twitter.com/UEi4KiXq2I— Manojkumar (@Manojkumar_099) July 14, 2022
रोहित सारखी फलंदाजी करता यावी
इमाम-उल-हक म्हणाला की, रोहित शर्माकडे खूप वेळ आहे. कारण जेव्हा मी पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षण करायचो तेव्हा गोष्टी कळतात. विराट कोहलीनेही माझ्यासमोर फलंदाजी केली आहे आणि रोहित शर्मानेही फलंदाजी केली आहे. रोहित शर्माकडे भरपूर वेळ आहे. तसेच जेव्हा रोहित शर्मा सेट होतो, तेव्हा तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे शॉट खेळतो आणि मलाही त्याच्या (रोहित) सारखी फलंदाजी करता यावी असे वाटते.
करिअर
26 वर्षीय इमाम-उल-हकने पाकिस्तानसाठी 52 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर अडीच हजारांहून अधिक धावा आहेत. इमाम-उल-हकनेही 9 शतके झळकावली आहेत. तर 14 कसोटी सामन्यांमध्ये इमामच्या नावावर केवळ 855 धावांची नोंद आहे.