T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारतीय संघाचा सलामीवीर विराट कोहली गुरुवारी टी-20 वर्ल्ड कपच्या सलग पाचव्या सामन्यामध्ये एकेरी धावसंख्येवर बाद झाला. इंग्लंडविरुद्ध गुआनामधील प्रोव्हीडन्स मैदानात खेळवण्यात आलेल्या सेमी-फायनलमध्ये विराट कोहली 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतला. विराटला या स्पर्धेमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेला नाही. विराटला वर्ल्ड कपमधील सात सामन्यामध्ये केवळ 75 धावा करता आल्या आहेत. म्हणजेच सरासरीचा विचार केल्यास विराटने प्रत्येक सामन्यात 7.5 धावा केल्या आहेत. सातपैकी दोन सामन्यांमध्ये तर तो भोपळाही न फोडता तंबूत परतला.
खरं तर टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमधील विराटची कामगिरी कायमच लक्षणीय राहिली आहे. मात्र गुरुवारचा इंग्लंडविरुद्धचा सामना याला अपवाद राहिला. विराटला स्वत:लाच या खेळीचा धक्का बसल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं आहे. विराट बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये चेहरा पाडून निराश होऊन बसल्याचं दिसून आलं. विराटचा हा चेहरा पडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सामान्यपणे हसताना किंवा काहीतरी चर्चा करताना दिसणारा विराट गंभीर भावमुद्रेत दिसत असून तो शून्यात पाहत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे निराश झालेल्या विराटला भारताचा प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड धीर देताना दिसत आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या सेमी-फायनलच्या सामन्यादरम्यान बाद झाल्यानंतर विराट कोहली डगआऊटमध्ये बसल्याचं कॅमेराने टीपलं. विराटच्या एका बाजूला जसप्रीत बुमराह आणि दुसऱ्या बाजूला रविंद्र जडेजा बसला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली अगदी तोंड पाडून निराश होऊन बसल्याचं दिसत आहे. विराट शून्यात नजर लावून सामना पाहत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी प्रशिक्षक राहुल द्रविड विराट जवळ येऊन त्याच्या मांडीवर हात ठेऊन त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो. द्रविड थेट काही बोलत नाही. मात्र विराट बसलेला असताना द्रविड त्याच्या पायावर हळूच थाप मारत धीर देत असल्याचं कॅमेराने टीपलं आहे. द्रविडने विराटला धीर देताना पाहून चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी फायनल आधी विराटला एवढं उदास पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे.
नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
विराट कोहलीने एवढं निराश होण्याची गरज नाही. भारत जिंकणार आहे. आम्हाला बॅटने उत्तर देणारा नेहमीचा कोहली बघायचा आहे. आम्ही तुला असं निराश बघू शकत नाही, असं एका चाहत्याने म्हटलं आहे. अनेकांनी द्रविडचंही कौतुक केलं असून प्रशिक्षक असा असावा असं म्हटलं आहे. वाईट परिस्थितीमध्ये खेळाडूला धीर देणारा आणि आधार वाटणारा प्रशिक्षक हा खरोखरच आदर्श असतो, असं अनेकांनी द्रविडचं कौतुक करताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट
विराट आणि द्रविडचा हा व्हिडीओ तुम्हीच पाहा...
Rahul dravid went to Virat as he was looking broken after that dismissal, can't see him like this man #INDvsENG pic.twitter.com/X0nPoSdF5s
— a v i (@973Kohli) June 27, 2024
एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावलेली. विराट टी-20 वर्ल्ड कपमध्येही दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होता. मात्र विराटला बांगलादेश वगळता एकाही सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध 28 बॉलमध्ये 37 धावा केल्या होत्या.
नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर या बातमीपासून दूरच राहा... उद्या ODI वर्ल्ड कपचीच पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी...
35 वर्षीय विराटचा हा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असेल असं म्हटलं जात आहे.