Points Table: पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? ग्रुप 2 मधून कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

3 सामन्यांच्या निकालानंतर टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पॉईंट्स टेबलमध्ये बराच गोंधळ झाला. 

Updated: Oct 27, 2022, 10:22 PM IST
Points Table: पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? ग्रुप 2 मधून कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट? title=

मेलबर्न : ICC T20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी मोठे सामने झाले. यावेळी एक मोठा उलटफेरही पहायला मिळाला. गुरुवारी एकूण 3 सामने खेळले जाणार आहेत. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 104 रन्सने पराभव केला, दुसरीकडे टीम इंडियाने नेदरलँड्सवर 56 रन्सने विजय मिळवला. तर सर्वात मोठा उटलफेर म्हणजे पाकिस्तानचा झिम्बाब्वेकडून दारूण पराभव झाला. या 3 सामन्यांच्या निकालानंतर टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पॉईंट्स टेबलमध्ये बराच गोंधळ झाला. 

टीम इंडिया 4 गुणांसह ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर 

आजच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा पराभव केल्यानंतर ग्रुप-2 मध्ये 4 पॉईंट्सोबत ती पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका 3 गुणांसह ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुख्य म्हणजे तिसऱ्या स्थानावर झिम्बाब्वेची टीम आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर त्यांना हे स्थान मिळालं आहे. नेदरलँडची टी गट-2 मध्ये तळाला आणि सहाव्या स्थानावर आहे. या टीमकडे अजून एकंही पॉईंट नाहीये.

टीम इंडियाचा नेट रन रेट दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत खूपच कमी आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट +1.425 आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +5.200 आणि झिम्बाब्वेचा रनरेट +0.050 आहे. तर याशिवाय बांगलादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांचं रनरेट मायनसमध्ये आहे. 

ग्रुप 1 मध्ये शर्यत चुरशीची 

ग्रुप 1 उपांत्य फेरीसाठी 5 टीम्समध्ये जबरदस्त स्पर्धा होणाप आहे. ग्रुप-1 मध्ये न्यूझीलंड 2 सामन्यांत 3 पॉईंट्स अव्वल आहे. याशिवाय श्रीलंका दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, आयर्लंड चौथ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या आणि अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. 

या ग्रुपमध्ये केन विलियम्सनच्या न्यूझीलंडची टीम सर्वात मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंडचा रन रेट +4.450 आहे. याशिवाय, श्रीलंकेचा नेट रन रेट +0.450, इंग्लंडचा नेट रन रेट +0.239, आयर्लंडचा नेट रन रेट -1.169, ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट -1.555 आणि नेट रन रेट आहे. 

ग्रुपमधील दोन टीम्सना मिळणार फायनलचं तिकीट

दोन्ही ग्रुपमध्ये एकून 6-6 टीम्स आहेत, त्यापैकी फक्त 2-2 म्हणजेच एकूण 4 टीम्स उपांत्य फेरीत प्रवेश करतील. सुपर-12 टप्प्यामधून आपापल्या ग्रुपमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या टीम्स उपांत्य फेरीत जातील. उर्वरित सर्व टीम स्पर्धेतून बाहेर पडतील.