येत्या पाच वर्षात विराट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार, 'या' दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी

सर्वाधिक शतकांचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे अबाधित आहे. सचिनने एकूण 100 शतकं लगावली आहेत.

Updated: Jul 23, 2021, 05:04 PM IST
येत्या पाच वर्षात विराट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार, 'या' दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी  title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) या दोघांची काही दिवसांपासून तुलना केली जात आहे. या सुरु असलेल्या तुलनेवर आता  पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रतिक्रिया दिली आहे. (Team India captain Virat Kohli will break Sachin Tendulkar world record of 100 centuries in the next 5 years predicts Shoaib Akhtar) 

शोएब काय म्हणाला?

"दोन्ही खेळाडूंमध्ये जी तुलना केली जात आहे, त्यानंतरही या दोघांमध्ये सुरु असलेली चर्चा चुकीची आहे. विराटच्या नावे 70 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे.  विराट सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. तर बाबरही पुढे वाटचाल करतोय. बाबर या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बाबरची गणना फॅब फाईव्हमध्ये केली जाऊ शकते", अशा विश्वास शोएबने व्यक्त केलाय. फॅब फाईव्हमध्ये विराट, जो रुट, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.

"विराट येत्या 5 वर्षात 30 शतक लगावणार" 

"शतकांबाबत या दोन्ही फलंदाजांमध्ये खूप अंतर आहे. विराट येत्या 5 वर्षांमध्ये 30 शतकं झळकावेल. अशी भविष्यवाणी शोएबने केली आहे. विराटने क्रिकेट कारकिर्दीत एकूण 120 शतकं लगावीत, किमान 110 शतकांपर्यंत मजल मारावी,अशी माझी इच्छा आहे",असं शोएबने म्हटलं. 

"तसेच विराट शतकांबाबतीत सचिनचा विक्रम मोडित काढेल", असंही शोएबने नमूद केलं. तो स्पोर्ट्स तक सोबत बोलत होता.  क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतकांचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावे अबाधित आहे. सचिनने एकूण 100 शतकं लगावली आहेत.