विराटचा विक्रम! पाँटिंग-लॉईडचं रेकॉर्ड मोडलं

कोलकात्यात सुरु असलेल्या ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Nov 22, 2019, 10:29 PM IST
विराटचा विक्रम! पाँटिंग-लॉईडचं रेकॉर्ड मोडलं title=

कोलकाता : कोलकात्यात सुरु असलेल्या ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्ध ३२वी रन करताच विराटने कर्णधार म्हणून ५ हजार रन पूर्ण केल्या आहेत. कर्णधार असताना सगळ्यात कमी इनिंगमध्ये ५ हजार रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे. ८६ इनिंगमध्येच विराटला हे रेकॉर्ड करता आलं.

विराटच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने कर्णधार असताना ९७ टेस्ट मॅचमध्ये ५ हजार रन पूर्ण केले होते. तर वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लॉईड यांनी कर्णधार असताना १०६ इनिंगमध्ये ५ हजार रन पूर्ण केल्या.

विराट ५ हजार रन करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक रन करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने कर्णधार असताना ८,६५९ रन केले. ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डर यांनी ९३ मॅचमध्ये ६,६२३ रन, पाँटिंगने ७७ मॅचमध्ये ६,५४२ रन, क्लाईव्ह लॉईडनी ७४ मॅचमध्ये ५,२२२ रन, स्टीफन फ्लेमिंगने ८० मॅचमध्ये ५,१५६ रन केले आहेत.

विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शून्यवर आऊट झाला होता. विराटची ८४वी टेस्ट मॅच आहे. याआधी ८३ टेस्ट मॅचमध्ये त्याने ७,०६६ रन केले आहेत, यामध्ये २६ शतकांचा समावेश आहे.