VIDEO: लग्न आणि ३ आठवड्यांच्या सुट्टीनंतर मैदानात उतरला विराट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. त्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात परतला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 30, 2017, 08:07 PM IST
VIDEO: लग्न आणि ३ आठवड्यांच्या सुट्टीनंतर मैदानात उतरला विराट title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. त्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात परतला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

विराट कोहलीने लग्नासाटी ३ आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. ६ डिसेंबर रोजी श्रीलंकेविरोधात शेवटची टेस्ट मॅच खेळल्यानंतर विराट कोहली सुट्टीवर गेला होता. ११ डिसेंबर रोजी विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीत विवाहबंधनात अडकले.

विराट कोहली सुट्टीवर गेल्याने त्याच्याशिवायच टीम इंडियाने टी-२० सीरिज खेळली. यावेळी टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली होती.

आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मॅचपूर्वी टीम इंडियाने सराव सुरु केला असून विराट कोहलीही मैदानात पहायला मिळाला.

cheteshwar pujara

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत पहायला मिळत आहे की, विराट कोहली बॅटिंगचा सराव करत आहे.

या दौऱ्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात ५ जानेवारी पहिली टेस्ट मॅच खेळणार आहे. दौऱ्यापूर्वी टीम इंडिया एक प्रॅक्टीस मॅच खेळणार होती मात्र, नंतर ही रद्द करण्यात आली.

या दौऱ्यात टीम इंडिया ३ टेस्ट मॅच, ६ वन-डे मॅचेस आणि ३ टी-२० मॅच खेळणार आहे.