Sreesanth In IPL 2023: आगामी आयपीएल 2023 म्हणजे 16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोची इथे होणार आहे. त्यासाठी आयपीएलमधील सर्व संघांनी रिलीज खेळाडूंची (Release Player list) यादी बीसीसीआयकडे पाठवली आहे. त्यामुळे आता आयपीएल लिलाव आणखी रंगदार होणार असल्याचं दिसतंय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) पुन्हा आयपीएलमध्ये (IPL) कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (Will Sreesanth make a comeback after retirement big breaking before IPL 2023 Mini Auction)
युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण क्रिकेटमधून निवृत्तीचा (Retirement) निर्णय घेत असल्याचं श्रीसंतने (S Sreesanth) जाहीर केलं होतं. मात्र, आता तो पुन्हा आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता असल्याची चर्चा क्रिडाविश्वात होताना दिसत आहे. सध्या श्रीसंतविषयीची मोठी माहिती मीडिया रिपोर्टसमधून समोर येत आहे. एस श्रीसंत आयपीएलच्या मोठ्या संघात गोलंदाजी प्रशिक्षक (bowling coach) म्हणून सामील होऊ शकतो, अशी माहिती समोर आल्याचं दिसतंय. यावर सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
आयपीएल फिक्सिंग प्रकरणात (IPL Spot fixing) श्रीसंतवर बंदी लावण्यात आली होती. त्याआधी थप्पड प्रकरणानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करियरला उतरती कळा लागली. त्यानंतर श्रीसंत संपला, असं म्हटलं गेलं. 2020 मध्ये जेव्हा श्रीसंतवरील बंदी संपली, त्यानंतर तो केरळकडून डोमेस्टिक सर्किटमध्ये खेळताना दिसला. मात्र त्यानंतर कोणत्याही फ्रँचायजीने त्याला आयपीएलमध्ये पाठिंबा दिला नाही.
आणखी वाचा - IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?
दरम्यान, आयपीएलमध्ये पाठिंबा न दिल्यानं त्यानं निवृत्ती जाहीर केली. श्रीसंत बांगला टायगर्सकडून खेळताना (Bangla Tigers) दिसणार आहे. 2013 साली श्रीसंतने पंजाबविरुद्ध सामना खेळला होता. त्यानंतर तो पुन्हा कॅमऱ्यात झळकला नाही. त्यानंतर आता श्रीसंत पुन्हा आयपीएलमध्ये (Sreesanth In IPL 2023) कमबॅक करणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा अडल्या आहेत.