World Cup Final मध्ये पराभूत झालेल्या विराटला पाहून अशी होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया...

World Cup Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामान खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारत सहाव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं....   

सायली पाटील | Updated: Nov 20, 2023, 11:18 AM IST
World Cup Final मध्ये पराभूत झालेल्या विराटला पाहून अशी होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया... title=
World Cup 2023 Anushka Sharma Hugs Heartbroken Virat Kohli After India Lost the final Against australia

World Cup Final : यंदाच्या म्हणजेच 2023 या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं सुरुवातीपासून उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामन्यापर्यंत संघ अपराजित राहिला. पण, Final मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 

नाणेफेक जिंक ऑस्ट्रेलियाच्या संघानं अंतिम सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. अवघ्या 240 धावांचं घेत ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि इथं त्यांनी भारतीय संघाला पराभूत केलं. 

स्वप्नभंग... 

विराट कोहली, रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंचा एकंदर आत्मविश्वास पाहता संघ सामना जिंकणार असाच विश्वास क्रिकेट चाहत्यांना होता. पण, तसं होऊ शकलं नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला Man Of the Series नं गौरवण्यात आलं. पण, वर्ल्ड कपवर नाव कोरता न आल्याचं खंत मात्र त्याच्या मनात घर करून होती. विराटच्या चेहऱ्यावरच हे दु:ख स्पष्टपणे दिसत होतं. 

पतीला खचलेलं पाहून स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी बसलेल्या अनुष्का शर्मानं अखेर त्याला आधार देत त्याचं सांत्वन केलं. संघाला पराभूत होताना पाहून अनुष्काच्याही चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. पण, खचलेल्या विराटला आधार देणं तिनं प्राधान्यस्थानी ठेवलं. सामन्यानंतर जेव्हा विराट स्टँड्समध्ये आला तेव्हा तिथं अनुष्कानं त्याला मिठी मारत दिलासा दिला. काहीही न बोलता तिची ही कृतीच खूप काही सांगून जाणारी आणि विराटला आधार देणारी होती, असंच हा फोटो पाहणारा प्रत्येक नेटकरी म्हणाला. 

 

हेसुद्धा वाचा : World Cup 2023 Final : ...अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं

 

सामन्यात नेमकं काय घडलं? 

Team India चा 6 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकपवर सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला ट्रॅव्हिस हेड. शानदार शतकी खेळत त्यानं ऑस्ट्रेलियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. फायनलमध्ये मॅचमध्ये भारत चांगली कामगिरी करेल अशीच अनेकांची अपेक्षा असताना भारतीय फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभी करण्यात सपशेल अपयशी ठरले. यानंतर गोलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करताच आली नाही. बॉलर्सनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि के.एल.राहुलचा अपवाद वगळता भारतीय बॅट्समन कांगारूंच्या बॉलर्ससमोर धडपडतांना दिसले. 

भारतानं 50 षटकांमध्ये सर्वबाद 240 धावा केल्या. 241 रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतानं सुरूवातीला 3 धक्के देत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 194 रन्सची पार्टनरशीप केली. या विजयानं ऑस्ट्रेलियानं आणखी एक इतिहास रचला.