न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड कसा?

Mohammed Shamis record against Australia: मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2023, 06:57 PM IST
न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड कसा? title=

Mohammed Shamis record against Australia: टिम इंडियाने वर्ल्ड कप 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. आता वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला अंतिम सामन्यात पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या फलंदाजीतील कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक वृत्तीबद्दल बरीच चर्चा होत असतानाच गोलंदाजीतील मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये शमीचा विक्रम 

या विश्वचषकात मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजीने विरोधी संघाच्या बॅट्समन्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. मोहम्मद शमीचा एकदिवसीय प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूप चांगला विक्रम पाहायला मिळाला आहे. ही टीम इंडियासाठी चांगली बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमीने 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.61 च्या सरासरीने 38 बळी घेतले. या काळात त्याने एका सामन्यात पाच बळी आणि एका सामन्यात चार बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. तर भारतात, शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28.79 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. ज्या दरम्यान शमीची सर्वोत्तम कामगिरी 51 धावांत 5 विकेट होती.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोहम्मद शमीचा विक्रम 

मोहम्मद शमीने अहमदाबादच्या मैदानावर आतापर्यंत एकही वनडे सामना खेळलेला नाही. या मैदानावर त्याने आयपीएलमध्ये एक कसोटी आणि 13 सामने खेळले असून शमीने कसोटीत केवळ 2 विकेट घेतल्या आहेत. तर शमीने 13 आयपीएल सामन्यांमध्ये केवळ 18.10 च्या सरासरीने 20 बळी घेतले आहेत. यापैकी शमीने दोन वेळा एका सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आहेत.

शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 3 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये 450 बळी पूर्ण करेल. याशिवाय शमीला वनडे फॉरमॅटमध्ये 200 विकेट पूर्ण करण्यासाठी आणखी फक्त 6 विकेट्स घ्यायच्या आहेत.