Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: भारताचाच नाही तर जगातील सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह फिल्डर म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जात अशा व्यक्तीने कॅच सोडला तर काय? त्याहून विशेष म्हणजे आधीच्या सामन्यात सर्वोत्तम कॅच घेण्यासाठी बेस्ट फिल्डरचं पदक पटकावणाऱ्या खेळाडूकडून कॅच सुटली तर? असं शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्यात खरोखर असं घडलं आहे आणि ते सुद्धा रविंद्र जडेजाकडून. काय तुमचाही विश्वास बसत नाही ना पण खरोखरच हा अशक्य वाटणारा प्रकार आज भारतीय चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान धरमशाला येथील मैदानात खेळवल्या जात असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 21 व्या सामन्यात घडला.
झालं असं की, 10 ओव्हरच्या आत भारताला 2 विकेट्स मिळाल्या. विल याँग आणि डेव्हॉन कॉनव्हे हे सलामीवर स्वस्तात तंबूत परतल्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांची जोडी जमल्याचं दिसून आलं. मात्र वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर विल याँगचा अडथळा दूर करणाऱ्या मोहम्मद शामीला त्याच्या दुसऱ्या आणि सामन्यातील 11 व्या ओव्हरलाही पुन्हा विकेट मिळाली असती. मात्र थेट रविंद्र जडेजाच्या हातात गेलेला बॉल त्याने सोडला आणि मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. अगदी जडेजाती पत्नी रिवाबाही सारा प्रकार अगदी थक्क होऊन पाहत राहिली.
विशेष म्हणजे उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रविंद्रला स्वस्तात बाद करण्याची संधी भारताने गमावली. जडेजाने कॅच सोडल्याच्या गोष्टीवर अनेकांना विश्वासच बसत नाही. अनेकांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जडेजाकडून असं कसं होऊ शकतं असा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी हा सोडलेला झेल भारताला महागात पडणार असल्याचं भाकित व्यक्त केलं आहे. जडेजावर या मोठ्या सामन्याचं प्रेशर असल्याचं काहींनी सोशल मीडियावरुन या सुटलेल्या कॅचसंदर्भात आपलं मत मांडताना म्हटलं आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहूयात..
Jadeja dropped an easy catch. pic.twitter.com/j7vM5qABUu
— choklizz (@choklizz178093) October 22, 2023
Jadeja's wife Rivaba's shami shocking reaction when jadeja dropped the catch #INDvsNZ #ICCCricketWorldCup #Jadeja #ViratKohli #abhiya pic.twitter.com/b23oSKlNmJ
— the fighter Boy (@the_fighter_Boy) October 22, 2023
बांगलादेशविरुद्धच्या भारताच्या सामन्यामध्ये सामन्यातील 43 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजीवर जडेजाने भन्नाट कॅच घेतला होता. बांगलादेशचा विकेटकीपर बॅट्समन मुश्फिकुर रहीम हा चांगला सेट झाला होता. 45 बॉलमध्ये 38 धावा करुन मुश्फिकुर रहीम बुमराहच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू खेळत होता. बुमराहने ऑफ स्टम्प बाहेर टाकलेला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न रहीमने केला. मात्र पॉइण्टला उभ्या असलेल्या जडेजाने चेंडू आपल्या दिशेने येताना पाहून स्वत:च्या उजवीकडे झेपावत हवेत असतानाच चेंडू अचूक टीपला. जडेजाने तब्बल दीड ते 2 फुटांपर्यंत डाइव्ह मारत हा चेंडू पकडला होता. हा झेल पकडल्याबद्दल जडेजाला सामन्यानंतर संघामध्ये अंतर्गत स्तरावर दिलं जाणारं बेस्ट फिल्डरचं मेडलही मिळालं होतं. याच जडेजाकडून आज सोपा झेल सुटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.