वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी

World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: आठवड्याभरामध्ये भारतात एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा सुरु होत असून त्यापूर्वीच संघात मोठा वाद निर्माण झाला आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 28, 2023, 04:02 PM IST
वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी title=
एका मुलाखतीमध्ये आपली भूमिका त्याने स्पष्टपणे मांडली

World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या स्पर्धेआधीच एका संघातील 2 खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला आहे. या वादाचा परिणाम असा झाला की वाद घालणाऱ्या खेळाडूचा 2023 च्या वर्ल्डकपच्या संघात स्थान देण्यात आलं नाही. अगदी रोहित शर्मापासून ते एम. एस. धोनीपर्यंतचा संदर्भ देत या खेळाडूला न खेळवण्याचं समर्थन कर्णधाराने उघडपणे केलं आहे.

वर्ल्डकपसाठी निवडलं तरी त्याला संघात घेणार नाही

आता आणखीन उत्सुकता ताणून न ठेवता सांगायचं झालं तर हा वाद बांगलादेशच्या संघामध्ये झाला. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन आणि ज्येष्ठ फलंदाज तमीम इक्बालमध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायची आणि सामन्यामध्ये खेळण्यासाठी उपलब्धतेच्या मुद्द्यावरुन वाद झाला. या वादानंतर शाकिब अल हसनने तमीम इक्बालला वर्ल्डकपच्या संघात स्थान दिलं तरी त्याला संघात खेळवणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळेच तमीम इक्बालला संघात स्थान देण्यात आलं नाही. आता पुन्हा एकदा शाकिब अल हसनने तामीम इक्बालवर हल्लाबोल केला आहे. शाकिबने थेट भारतीय कर्णधार रोहित शर्माचा उल्लेख करत तामीम इक्बालला सल्ला दिला आहे.

आम्ही हे सुद्धा सांगू शकत नाही का?

34 वर्षीय तमीम इक्बालने काही काळापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी गळ घातल्याने तमीम इक्बालने निवृत्ती मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 शतकं झळकावली असून त्याच्या नावावर 13 हजारांहून अधिक धावा आहेत. शाकिब अल हसनने 'टी स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तमीम इक्बालसंदर्भात मत व्यक्त केला. "संघाशी संबंधित एका वरिष्ठ व्यक्तीने तमीम इक्बालला चौथ्या क्रमांकावर खेळण्यास सांगितलं होतं. आता हा सल्ला दिला तर त्यात वाईट काय आहे. संघाचं संतुलन राखण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. आता आम्ही एखाद्या खेळाडू अमुक जागेवर फलंदाजी करं असं सांगूही शकत नाही का? आधी संघ आणि मग खेळाडू हेच धोरण असायला हवं," असं शाकिब अल हसन म्हणाला. 

थेट रोहित शर्माचा संदर्भ दिला

तमीम इक्बालने 243 एकदिवसीय सामन्यांमध्ये 240 डावांत 5134 धावा केल्या आहेत. त्याने सर्वच्या सर्व 240 डावांमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. यामध्ये 10 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. शाकिब अल हसनने यावेळी बोलताना थेट रोहित शर्माचा उल्लेख केला. "रोहित शर्मासारख्या खेळाडूला पाहा. त्याने 7 व्या क्रमांकापासून सुरुवात करत सलामीवीरपर्यंतचा प्रवास केला. रोहितने 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने (तमीम इक्बालने) कधी तरी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर यात अडचण निर्माण होण्यासारखं काय आहे? तो फार बालिशपणा करतोय," असं शाकिब अल हसन म्हणाला. "सलामीवीर म्हणून आपली जागा निश्चित असून त्या ठिकाणी दुसरं कोणी खेळू शकत नाही असं त्याला वाटतं. एक खेळाडू म्हणून तुम्ही संघासाठी गरज असेल त्या क्रमाकांवर फलंदाजी केली पाहिजे. तुम्ही 100 किंवा 200 धावा केल्या आणि संघ पराभूत होत असेल तर अशा कामगिरीला काही अर्थ राहत नाही," असं शाकिब अल हसन म्हणाला.

नक्की वाचा >> 'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण

संघाचा विचारच करत नाहीत

तमीम इक्बालवर टीका करताना शाकिब अल हसनने, अनेकजण संघाचा अजिबात विचार करत नाही. त्याला खालच्या क्रमाकांवर खेळण्याचा सल्ला संघाच्या हितासाठी देण्यात आला होता. यात काय चुकीचं आहे? तुम्ही तेव्हा एखाद्या संघामध्ये खळेण्यासाठी पात्र असता जेव्हा अशा गोष्टी तुम्ही सहज स्वीकारता. मी तमीम इक्बालकडे खालच्या क्रमाकांवर खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूशी किंवा मेडिकल टीमबरोबर चर्चा केली नव्हती. हा बोर्डाचा निर्णय होता," असं शाकिब अल हसनने सांगितलं.

नक्की वाचा >> भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'

धोनीचा संदर्भ देतही साधला निशाणा

तसेच तमीम इक्बालने आपण पूर्णपणे तंदरुस्त नाही. मला वर्ल्डकपमध्ये मोजकेच सामने खेळता येतील, असं म्हटलं होतं. यावरुनही शाकिब अल हसनने, "लोकांना माझ्यावर शंका असू शकते. पण एकदा एम. एस. धोनीने म्हटलेलं त्याप्रमाणे, जर जखमी खेळाडू खेळत असेल तर तो संघाला आणि देशाला फसवत असतो," असं म्हणत निशाणा साधला.