आरोग्य

या कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर!

दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे.

Apr 7, 2018, 06:19 PM IST

उन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी

उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. 

Apr 6, 2018, 01:22 PM IST

तांदळाचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता. शरीराला उर्जा मिळते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.

Apr 4, 2018, 11:27 AM IST

दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण

दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

Apr 4, 2018, 08:45 AM IST

रात्रीचे केळे खाणे कितपत योग्य...घ्या जाणून

पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात. 

Apr 3, 2018, 03:49 PM IST

नितळ आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी पार्लर नको...करा हा उपाय

गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो. 

Apr 3, 2018, 12:29 PM IST

दररोज प्या पालकाचा रस, होतील अनेक फायदे

पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.

Mar 29, 2018, 04:58 PM IST

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...

उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत

Mar 29, 2018, 02:50 PM IST

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

Mar 29, 2018, 11:29 AM IST

या एका उपायाने दूर करा केस आणि त्वचेच्या समस्या!

आजकाल जितके काम असते त्यापेक्षा ताणच जास्त असतो.

Mar 28, 2018, 11:31 AM IST

Summer Food: हे पदार्थ खा आणि उन्हाळ्यात वजन घटवा

तुम्ही उन्हाळ्यात जर काही पदार्थ आहारात वापरले तर, तुमच्या वाढत्या वजनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच, आपले शरीरही तंदुरूस्त राहू शकते.

Mar 27, 2018, 06:03 PM IST

या टिप्सने उन्हाळ्यात करा घाम व दुर्गंधीपासून केसांचे संरक्षण!

उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. 

Mar 27, 2018, 11:58 AM IST

नाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा

नाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा

Mar 26, 2018, 09:04 PM IST

शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक

राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो. 

Mar 26, 2018, 08:48 AM IST