भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.
Jun 27, 2013, 01:44 PM ISTत्र्यंबकेश्वरला घडणार उत्तराखंडाची पुनरावृत्ती?
उत्तराखंडात जसा हिमालय आणि त्याच्या पायांवरुन वाहणारी गंगा, तसंच महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी आणि तिथूनच उगम होणारी गोदामाई. ही दोन चित्रं ठळकपणे दाखवण्याचं कारण म्हणजे जे उत्तराखंडात घडलं ते त्र्यंबकेश्वरातही घडू शकतं.
Jun 26, 2013, 09:31 PM ISTउत्तराखंड : ध्येयवेड्या... `त्या` दोन जोड्या!
उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत.
Jun 26, 2013, 02:37 PM ISTकेदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट
केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 26, 2013, 01:47 PM ISTहेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.
Jun 26, 2013, 01:37 PM ISTहेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....
उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.
Jun 26, 2013, 10:35 AM ISTआज पुन्हा टीहरीमध्ये ढगफूटी, तीन ठार!
उत्तराखंडवर पुन्हा एकदा निसर्गानं आपली अवकृपा दाखवून दिलीय. पुरात सगळंच उद्ध्वस्त झाल्यानंतर आज ‘टेहरी’च्या देवप्रयाग भागात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ढगफूटी झाली.
Jun 25, 2013, 05:10 PM ISTउत्तराखंड : ९,००० लोक अद्यापि बेपत्ता
उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.
Jun 25, 2013, 05:03 PM ISTप्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!
साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.
Jun 25, 2013, 04:59 PM ISTउत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचा कॅम्प सुरू….
उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आणि त्यांना सुरक्षित राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोचरला कॅम्प सुरु केलाय. तर आजपासून जोशीमठला कॅम्प सुरू होणार आहे.
Jun 25, 2013, 12:16 PM ISTअखेर राहुल गांधीही उत्तराखंड दौऱ्यावर!
उत्तराखंड प्रकरणावरुन झालेल्या टीकेमुळे राहुल गांधी आजपासून उत्तराखंड राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या देहराडूनमध्ये असलेल्या नियंत्रण कक्षालाही भेट देतील
Jun 24, 2013, 06:31 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांची असंवेदनशीलता!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
Jun 24, 2013, 05:31 PM ISTउत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Jun 24, 2013, 01:45 PM ISTउत्तराखंड : बचावकार्याला पावसानं घातला खोडा!
उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलंय.
Jun 23, 2013, 01:31 PM ISTसहा दिवस `तो` वडिलांचा मृतदेह पाहातच राहिला!
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...
Jun 23, 2013, 01:08 PM IST