‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सुरू करणार 5000 नवे ATM
मुंबईः चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल पाच हजार एटीएम सुरू करणार आहे. डेबिट कार्डमागे एटीएम व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतला आहे. एटीएम मशिन्सची उपलब्धता ही समस्या असून मशिन्स जसजसे मिळतील तशी एटीएमची संख्या वाढवली जाईल, असं बँकेचे एमडी कृष्णकुमार यांनी सांगितलंय.
Jul 2, 2014, 09:31 AM ISTदुसऱ्या बँकेचे ATM वापरणाऱ्यांनो सावधान
सुरक्षेच्या नावाखाली देशातील काही प्रमुख बँका एटीएमचे मोफत ट्रानझाक्शन काही शहरांमध्ये कमी करण्याच्या तयारी आहे. तुम्ही मोठ्या शहारत राहत असाल आणि तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हांला प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.
Jun 27, 2014, 09:16 PM IST‘एटीएम’ भंगलं… महायुतीसमोर राज ठाकरेंचं आव्हान!
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.
Jun 6, 2014, 10:51 AM ISTजुलैनंतर सर्व नवे एटीएम बोलणारे असावेः RBI
येत्या २०१४ जुलैपासून सर्व नवे एटीएम मशीन बोलणारे असावेत, तसेच त्याचे ब्रेल की-पॅड उपलब्ध करण्यात यावे, असे रिझर्व बँकेने बुधवारी सर्व कमर्शिअल बँकांना निर्देश दिले आहे. सर्व एटीएम मशीनमध्ये (ऑडिबल) सूचना देणारी यंत्रणा असावी असे रिझर्व आदेश आहे.
May 21, 2014, 09:38 PM ISTआता एटीएममधून मिळणार 50 रुपयांच्या नोटा
एटीएम मशिनमधून आता जबरदस्तीने 500 रुपयांच्या नोटा घ्याव्या लागणार नाही. कारण आता 100 रुपयांबरोबरच 50 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासणार नाही.
May 21, 2014, 04:19 PM ISTएटीएममधून पैसे काढताना मुंबईकरांनो सावधान!
एटीएमला स्कीमर बसवून पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे. आपण पैसे काढतो, त्या एटीएमला स्कीमर लावलेले तर नाही ना, हे कार्ड स्वॅप करतांना पाहणे आवश्यक आहे.
Apr 30, 2014, 09:00 PM ISTगुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार
बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
Apr 23, 2014, 12:24 PM ISTएटीएम कार्ड नसतांनाही पैसे काढता येणार
तुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.
Mar 25, 2014, 11:37 PM IST९५ टक्के एटीएम ८ एप्रिलनंतर हॅक होऊ शकतात
एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.
Mar 18, 2014, 08:39 PM ISTधक्कादायक : एटीएम सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार
कोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.
Mar 14, 2014, 11:22 AM ISTबँकांची `एटीएम`सह, सर्व्हिस चार्ज वाढवण्याची तयारी
बँकांनी एटीएम ट्रांझॅक्शन फी वाढवली नसली, तरी दुसऱ्या सेवांसाठी चार्जेस वाढवायची तयारी काही बँकांनी सुरू केली आहे.
Mar 11, 2014, 12:02 PM ISTतुमच्याकडे एटीएम नसेल तरीही पैसे काढू शकता...
बॅँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरुन रोख रक्कम मिळवणं लवकरच शक्य होणार आहे. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे स्पष्ट केलंय.
Feb 13, 2014, 08:13 AM ISTएटीएम हल्ल्यावर आता विमा संरक्षण
एटीएममध्ये जर तुमच्यावर हल्ला झाला, तर तुम्हाला आता यावर विमा संरक्षण असणार आहे. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एटीएमच्या आत हल्ला झाल्यास विमा संरक्षण देण्यावर, बँकाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 9, 2014, 07:12 PM ISTआता एटीएम मशिन रात्रीची बंद राहणार
रात्री-अपरात्री तुमच्यावर एटीएममधून पैसे काढण्याची वेळ आली, तर तुमची पंचाईत होऊ शकते. `एनी टाईम मनी` आणि `२४ तास केव्हाही पैसे काढा`, असं म्हणत उभी राहिलेली ही एटीएम सेंटर्स आता रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.
Feb 6, 2014, 11:40 AM ISTएटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!
एटीएममधून आतापर्यंत आपण केवळ पैसे काढले आहेत. आता एटीएममधून दूध मिळणार.... तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अमूल डेअरीने एनी टाइम मिल्क (एटीएम) मशीन लावले आहे.
Jan 27, 2014, 09:20 PM IST