पाकिस्तान

नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा

 

न्यू यॉर्क :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे. 

अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Sep 21, 2016, 11:32 PM IST

ओबामांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, नाव न घेता खडसावलं

संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानवर नाव न घेता हल्लाबोल केला आबहे. ओबामांनी म्हटलं की, पाठीत वार करण्यापासून पाकिस्तानने वाचावं. नाहीतर दहशतवाद तुम्हाला नष्ट करुन टाकेल. दहशतवादामुळे पश्चिम आशिया प्रभावित होत आहे. ओबामाने भारत आणि चीनचं कौतूक केलं. म्हटलं की, अंतरराष्ट्रीय व्यवस्थेमुळे चीन आणि भारत शानदार विकास करत आहे.

Sep 21, 2016, 11:17 PM IST

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं हेडक्वार्टर - अफगाणिस्तान

संयुक्त राष्ट्र महासभेत अफगाणिस्तानने दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवलं आहे. अफगाणिस्तानने महासभेला संबोधित करतांना म्हटलं की, जगाला माहित आहे की, पाकिस्तान हे दहशतवादाचं हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानला अनेकदा सूचना दिल्या गेल्या आहेत की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा पण पाकिस्तानने आजपर्यंत तालिबानी दहशतवाद्यांविरोधात देखील कारवाई नाही केली.

Sep 21, 2016, 10:43 PM IST

भारताचे 2 दिवसात 3 मिसाईल परीक्षण, पाकिस्तानची उडाली झोप

उरी हल्ल्यानंतर भारताने दोन दिवसात तीन वेळा मिसाईल परीक्षण केलं आहे. पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे की, जर पाकिस्तान त्यांच्या कारवाया सुरुच ठेवेल तर मग त्यांना जगाच्या नकाशातून गायब करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पाकिस्तान देखील भारताच्या या परीक्षणानंतर धास्तावला आहे.

Sep 21, 2016, 09:04 PM IST

चीनने उरी हल्ल्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणावावर चिंता व्यक्त करताना चीनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी प्रतिबद्ध राहत योग्य प्रकारे यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन चीनने केले आहे. 

Sep 21, 2016, 08:41 PM IST

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स

उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'

Sep 21, 2016, 07:34 PM IST

सलीम खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ट्विटरद्वारे खडे बोल सुनावले आहेत. उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी सलीम खान यांनी नवाज शरीफाना फटकारत नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बे-नवाज शरीर म्हटलं आहे.

Sep 21, 2016, 05:34 PM IST

पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे.  देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Sep 21, 2016, 04:05 PM IST

'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा'

अमेरिकच्या दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेत विधेयक मांडलंय.

Sep 21, 2016, 12:24 PM IST

उरी चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी एक जवान शहीद

दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.

Sep 20, 2016, 06:01 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते  

Sep 20, 2016, 02:55 PM IST

पाकिस्तानला युद्धानंच उत्तर देण्याची वेळ आलीय - अण्णा हजारे

पाकिस्तानला युद्धानंच उत्तर देण्याची वेळ आलीय - अण्णा हजारे 

Sep 20, 2016, 02:51 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST