बीसीसीआय

आयपीएलचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’

आयपीएल प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.

Jun 11, 2013, 11:02 AM IST

राज कुंद्रा बीसीसीआयकडून निलंबित

आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.

Jun 10, 2013, 02:46 PM IST

`जुन्या बाटलीत जुनीच वाईन आणि लेबलही जुनंच!`

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.

Jun 2, 2013, 10:40 PM IST

जगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

Jun 2, 2013, 05:40 PM IST

स्पॉट फिक्सिंग : राजीव शुक्ला यांचा राजीनामा

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय.

Jun 1, 2013, 07:20 PM IST

बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!

आयपीएल मधील मॅच फिक्सींग वरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

May 31, 2013, 08:52 PM IST

आयसीसीला लागली होती फिक्सिंगची भनक

विंदू दारासिंग आणि मयप्पन यांच्या बटेंगची माहिती आयसीसीला अगोदरपासूनच होती, अशी धक्कादायक माहिती क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालीय.

May 31, 2013, 06:58 PM IST

श्रीनिवासन यांची विकेट जाणार?

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीय.

May 30, 2013, 04:19 PM IST

‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.

May 29, 2013, 07:24 PM IST

स्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?

चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

May 28, 2013, 03:29 PM IST

फिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग

बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.

May 27, 2013, 01:27 PM IST

स्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज

स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.

May 27, 2013, 11:17 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही- श्रीनिवासन

श्रीनिवासन यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीबाबत विचारले असता उडवून लावलं. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

May 26, 2013, 05:37 PM IST

मय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.

May 26, 2013, 01:43 PM IST

मी राजीनामा देणार नाही - श्रीनिवासन

श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.

May 25, 2013, 02:09 PM IST