भारतरत्न

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत कोअर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक झाली. यात यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Dec 24, 2014, 09:35 AM IST

'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?

यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

Dec 10, 2014, 10:44 AM IST

भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा वादंग

केंद्रानं पाच भारतरत्न पदक बनवण्याचे टाकसळीला आदेश दिल्यानंतर ते पाच जण कोण असणार या पासून ते कोण कोण असावं इथपर्यंत चर्चेला सुरूवात झाली आणि वाद ही निर्माण झाला.

Aug 11, 2014, 10:07 PM IST

नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको!

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़

Aug 11, 2014, 01:04 PM IST

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Aug 9, 2014, 03:03 PM IST

`भारतरत्ना`ची मॅच आधीच फिक्स झाली होती!

देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली..

May 21, 2014, 09:58 AM IST

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे.

सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

Feb 13, 2014, 02:07 PM IST

व्हिडिओ : सचिन, प्रो. राव यांना भारतरत्न प्रदान

विक्रमादित्य  सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.

Feb 4, 2014, 12:52 PM IST

आयला... आपला सचिन होणार भारतरत्न!

सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.

Feb 3, 2014, 09:39 PM IST

खाशाबा जाधवांचं ऑलिम्पिक पदक समुद्रात फेकू - रंजीत जाधव

भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.

Jan 2, 2014, 09:45 PM IST

‘क्रिकेटरत्ना’ला भारतरत्न देण्यावर आक्षेप; याचिका दाखल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.

Nov 19, 2013, 08:37 PM IST

वाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.

Nov 18, 2013, 04:00 PM IST

सचिन तेंडुलकर फुकटात क्रिकेट खेळलेला नाही - तिवारी

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला... परंतु या पुरस्कारावर जेडीयूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

Nov 18, 2013, 01:46 PM IST