मुंबई लोकल

सहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट

कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.

Jan 2, 2015, 11:49 AM IST

मुंबई लोकलमध्ये एका ग्रुपने तरुणाला धू धू धुतले...

रात्री मुंबई किती असुरक्षीत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ही घटना आहे २१ डिसेंबर म्हणजे काल रात्री १०.३० वाजताच्या सीएसटी कर्जत लोकल ट्रेन मधील. घाटकोपरमध्ये चढलेल्या एका प्रवाशाला गाडीतील काही हुल्लडबाजांनी मारहाण केली.

Dec 22, 2014, 10:48 AM IST

लोकलमधील भजनी मंडळ आता बंद!

मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.

Dec 11, 2014, 05:43 PM IST

मुंबईकरांना आता शनिवारीही मेगाब्लॉगचा मनस्ताप

मुंबईकरांची रेल्वे समस्या दिवसा गणिक वाढत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने नविन शक्कल लढविली आहे. रेल्वे समस्या सोडविण्यासाठी आता रविवारआधी शनिवारी मेगाब्लॉग घेणार आहे. त्यामुळे रेल्वेचे मेगाब्लॉक आता शनिवारच्या मुळावरही उठले आहेत.

Nov 7, 2014, 09:55 AM IST

लोकलचा आज मेगाब्लॉक, पाहा कधी, कुठे?

आज रविवार आणि मेगा ब्लॉक असल्याने मुंबई आणि उपनगरांत तुम्हाला कुठंही जायचं असेल, तर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार  आहे.

Oct 26, 2014, 10:35 AM IST

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

संततधार पावसामुळे स्लो ट्रॅकवरची अपडाऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. 

Sep 2, 2014, 08:06 AM IST

लोकलमध्ये दादागिरी ; ग्रुपमधील गुंडाला अटक

डहाणू लोकलकमध्ये प्रवाशांना अप-डाऊन करणारे काही ग्रुप्स जागेवरून उठवण्यासाठी दादागिरी करतात. 

Aug 12, 2014, 11:46 PM IST

पाहा मुंबईच्या तुलनेत लंडनचा लोकल प्रवास

मुंबईची लाइफलाईन, रोज लाखो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात आणि हा प्रवास आहे जगभरातला सगळ्यात स्वस्त प्रवास. कारण मुंबईतल्या ट्रेनचं तिकीट सगळ्यात कमी आहे.

Aug 5, 2014, 11:24 PM IST

मुंबईत महिला अत्याचारांत वाढ

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.

Jun 6, 2014, 11:38 PM IST

मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला

लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.

Jun 5, 2014, 05:49 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीमध्ये बिघाड

मध्य रेल्वेच्या वाहतुकाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण, ठाणे, भांडूप, कुर्ला या स्थानंकावर प्रचंड गर्दी झाली होती.

Mar 8, 2014, 10:39 AM IST

मुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...

मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्‍या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.

Feb 7, 2014, 09:56 PM IST

४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी

मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..

Jan 10, 2014, 07:32 PM IST