amitabh bachchan

'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन

'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन

Feb 6, 2015, 01:11 PM IST

वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री

क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 

Feb 2, 2015, 02:46 PM IST

रवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.

Jan 26, 2015, 09:22 AM IST

बीग बींना मिळाला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार

बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. 

Jan 15, 2015, 11:14 AM IST

अमिताभ अजूनही खूपच हॉट - बिपाशा बासू

महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 08:12 AM IST

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

Jan 8, 2015, 10:41 AM IST

मोदींना मदत करण्याचे वृत्त अमिताभ बच्चन यांनी फेटाळलं

केंद्र सरकारच्या जाहितारीमध्ये काम करणार असल्याचं वृत्त अभिनेता अमिताभ बच्चन यांनी फेटाळलंय. पंतप्रधान कार्यालयातर्फे सरकारी जाहिरातीत काम करण्याविषयी आपल्याला कोणतीही ऑफर मिळालेली नसल्याचं बच्चन यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलंय.

Jan 2, 2015, 08:17 AM IST

मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.

Dec 31, 2014, 06:27 PM IST

व्हिडिओ: बिग बींची फिल्‍म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.

Dec 31, 2014, 01:28 PM IST

अमिताभ बच्चन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

बॉलिवूडचा बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. 

Dec 20, 2014, 10:24 PM IST

व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!

'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 19, 2014, 03:03 PM IST

...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.

Nov 18, 2014, 08:07 AM IST