हल्ल्याचा कट काँग्रेसचाच – अण्णा हजारे
आमच्यावर हल्ला हा काँग्रेसचाच कट असल्याचं अण्णांनी म्हटलंय. तसंच हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला.
May 17, 2012, 03:05 PM ISTश्वेतपत्रिकेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये खडाजंगी!
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून आजच्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी झाली. श्वेतपत्रिकेबाबत राष्ट्रवादीनं अनुकुलता दर्शवलीय. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात सिंचनाबाबत सादरीकरण झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी माहिती मुख्य़मंत्र्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
May 16, 2012, 09:09 PM ISTकाँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीला राणे अनुपस्थित
काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश यांनी बोलावलेल्या राज्यातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उद्योग मंत्री नारायण राणे गैरहजर राहिल्याने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत काय अशी चर्चा सुरु झालीय.
May 11, 2012, 12:02 AM ISTविधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
May 7, 2012, 08:41 PM ISTराष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना 'करारा जवाब'
राज्यातल्या सिंचनाच्या क्षेत्रावरून सत्तारूढ आघाडीत जुंपण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेच्या सूचनेवर राष्ट्रवादी संतापलीय. उपमुख्यमंत्र्यांनी तर सिंचन क्षेत्र वाढल्याची आकडेवारीच सादर करत मुख्यमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.
May 5, 2012, 04:54 PM ISTमुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार
राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षांत केवळ 0.1 टक्के इतकीच वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर पलटवार केलाय.. दुष्काळानं राज्यातली जनता होरपळलेली असताना, आघाडीचे नेते मात्र राजकारणातच दंग असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
May 5, 2012, 12:17 PM ISTमनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा
महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.
May 5, 2012, 08:59 AM ISTउद्धव ठाकरेंनी ओढला काँग्रेसवर आसूड!
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर आसूड ओढलाय. पतंगरावांसारखे मंत्री महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलयं.
May 4, 2012, 03:28 PM ISTराष्ट्रवादीला शह देण्यासाठी राहुल दौरा
साता-यातला दुष्काळी भागातला दौरा राहुल गांधींनी अवघ्या अडीच तासांत आटोपलाय. फक्त आश्वासन देऊन राहुल गांधींनी ग्रामस्थांची बोळवण केलीय. महत्त्वाचा प्रश्न हा की राहुल गांधींना महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या व्यथा कळल्या का.... दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, नंतर शरद पवारांनीही या भागाचा दौरा केला. त्यानंतर आता राहुल गांधींनी याच भागाचा दौरा केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा एकमेकांना शह देण्याचा प्रकार सुरू आहे.
Apr 28, 2012, 01:40 PM ISTसचिन खासदार होणार?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 27, 2012, 08:40 AM ISTपुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली
पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.
Apr 25, 2012, 03:40 PM ISTसरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपडले
डिझेल आणि खतांच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्याविरोधात आंदोलन करणार आहे. तशी तयारी राष्ट्रवादीने केली आहे. केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असली तरी काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंग काही नेत्यांनी बांधल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा धुसफूसचे वारे वाहण्याची नांदी मिळाली आहे.
Apr 25, 2012, 02:12 PM ISTसिंघवींच्या बचावासाठी खुर्शीद मैदानात
कथित सीडी वादावर भाजपने अभिषेक मनु सिंघवींकडून संसदेत स्पष्टीकरण मागितल्यावर कायदे मंत्री सलमान खुर्शीद सिंघवींच्या मदतीला धावून आले आहेत. हा मुद्दा संसदेत उपस्थित होणं योग्य नाही. याऐवजी देशातील जनतेच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणं जास्त महत्तवाचं आहे. असं खुर्शीद म्हणाले.
Apr 24, 2012, 05:14 PM ISTराष्ट्रवादीची काँग्रेसला धमकी
ठाणे महापालिकेतल्या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचा संताप झाला आहे. राज्यात आघाडी ठेवायची की नाही ते काँग्रेसनं जाहीर करावं, अशी धमकीच राष्ट्रवादीनं दिली आहे. त्यामुळे दोन्हा काँग्रेसच्या आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Apr 20, 2012, 01:00 PM ISTकाँग्रेस-सेनेचे साटंलोटं, काँग्रेस विरोधी पक्षपदी
ठाणे महानगर पालिकेत काँग्रेस-शिवसेनेनं हातमिळवणी करून विरोधी पक्षनेतेपदापासून राष्ट्रवादीला दूर ठेवलंय. राष्ट्रवादीची संख्या जास्त असताना विरोधी पक्षनेतेपती काँग्रेसच्या मनोज शिंदेंची नियुक्ती करण्यात आलीय.
Apr 19, 2012, 10:42 PM IST