हे तर मॅचफिक्सिंग- मुलायमसिंग यादव
संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय. हे दोन्हा पक्षांना चर्चा नको असून हे सर्व काँग्रेस भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप मुलायमसिंह यांनी केलाय.
Aug 30, 2012, 12:35 PM ISTराज ठाकरेंना काँग्रेसने मोठं केलं - आझमी
मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांची बदली करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे करीत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
Aug 23, 2012, 10:24 PM ISTप्रियंका गांधी जनतेच्या दरबारात
प्रियांका गांधींवर आता नवी जबाबदारी येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत रायबरेली मतदार संघाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर राहील. याखेरीज नवी दिल्लीत प्रियांका जनता दरबार घेतील असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं.
Aug 4, 2012, 09:02 PM ISTराष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तशाच शब्दांत उत्तर दिले.
Jul 30, 2012, 08:41 PM ISTमुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!
मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.
Jul 29, 2012, 09:47 PM ISTसोनिया-राहुल यांना आव्हान म्हणजे हत्तीशी टक्कर!
आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे.
Jul 29, 2012, 06:52 PM ISTएन डी तिवारीच रोहित शेखरचे पिता!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी हेच रोहित शेखर यांचे पिता असल्याचे डीएनए टेस्टच्या निकालात सिद्ध झाले आहे. तिवारी यांच्या डीएनए चाचणीचा अहवाल आज उच्च न्यायालयाने जाहीर केला.
Jul 27, 2012, 06:18 PM ISTतिवारींची याचिका फेटाळली; रिपोर्ट होणार जाहीर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांचा डीएनए रिपोर्ट आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय.
Jul 27, 2012, 01:13 PM ISTठाण्यात दोन्ही काँग्रेसमध्ये समेट
कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालय. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.
Jul 26, 2012, 11:37 PM ISTराहुल गांधींना लोकसभा नेतेपद?
राहुल गांधींना लोकसभा नेतेपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या 10 खासदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. ही सध्याची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.
Jul 26, 2012, 05:54 PM ISTकाँग्रेस थंड, राष्ट्रवादी अस्वस्थ
शरद पवारांची नाराजी अजूनही कायम आहे. मात्र पवारांच्या नाराजीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी थंड प्रतिसाद दिल्याने, राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढीस लागली आहे.
Jul 24, 2012, 09:46 PM ISTदोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस, अडचणी वाढल्या
राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु असताना समन्वय समितीच्या बैठकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असमन्वय निर्माण झालाय. राष्ट्रवादीला समन्वय समितीच्या बैठकीबाबतचे पत्र देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. तर बैठकीच्या पत्राबाबतचा काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय.
Jul 23, 2012, 02:40 PM ISTशरद पवारांचा काँग्रेसवर रूसवा कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार पु्न्हा नाराज झाले आहेत. हे त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत आहे. याआधी नंबर दोनवरून धुसफुस झालेल्या पवारांनी राजीनाम्याची तयारी चालविली होती. त्याबाबत मीडियात खूप चर्चा झाली. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. आता तर त्यांनी चहापानाला अनुपस्थिती दर्शवली.
Jul 23, 2012, 12:33 PM ISTराष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांविरूद्ध दंड थोपडले
केंद्रातल्या काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेल्या राष्ट्रवादीनं राज्यातही मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम उघडली आहे. राज्यातलं नेतृत्व बदल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.
Jul 23, 2012, 09:25 AM ISTमोठ्या 'जबाबदारी'साठी युवराज सज्ज!
राहुल गांधींनी मोठी जबाबदारी स्विकारावी, अशी काँग्रेस नेत्यांकडूनच होणाऱ्या मागणीबद्दल आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मौनव्रत तोडलंय. आपण लवकरच पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सुतोवाच आज खुद्द ‘युवराजां’नी केलंय.
Jul 19, 2012, 12:36 PM IST