crime

पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात

आपल्या देशात कलियुगात काय होईल, हे सांगता येत नाही. पुन्हा महाभारताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इतिहासातील काळा दिवस पुन्हा उजाडलाय. जुगार खेळण्यासाठी चक्क पत्नीलाच पणाला लावले. या दुर्दैवी प्रकाराबाबत उद्वेग व्यक्त होत आहे.

Dec 4, 2012, 03:57 PM IST

फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट करणाऱ्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय पालघर सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. शाहिन महाराष्ट्र सोडणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

Dec 3, 2012, 07:44 PM IST

लेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!

पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.

Nov 4, 2012, 10:01 PM IST

पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.

Nov 3, 2012, 01:39 PM IST

परभणीत महिला पोलिसाची हत्या

परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

Nov 2, 2012, 02:01 PM IST

दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले

पुण्यातील रास्ता पेठ भागात असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले आहे.

Nov 2, 2012, 10:23 AM IST

प्रेयसीने केला प्रियकरावर गोळीबार

पाकिस्तानमध्ये निकाह करण्यासाठी प्रियकराने कबुल कबुल म्हणण्यास नकार दिल्याने प्रेयसीनेच बंदूक घेवून प्रियकराचा समाचार घेतला. तिने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे प्रियकरासह अनेक जण गंभीर जखमी झालेत.

Oct 19, 2012, 07:47 PM IST

१४ वर्षीय विद्यार्थींनीवर तालिबानी हल्ला

शांततेसाठी लढा देणाऱ्या एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर तालिबानी दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला. दरम्यान, मलाला हिच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Oct 9, 2012, 04:26 PM IST

नाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`

नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.

Sep 29, 2012, 08:17 AM IST

पत्नीचा अश्लील MMS बनवणाऱ्या पतीस अटक

आपल्या पत्नीचा अश्लील MMS तयार करून तिला ब्लेकमेल करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. निशांत कल्लूलाथिल असं या आरोपीचं नाव आहे.

Sep 22, 2012, 02:19 PM IST

ज्योतीकुमारीच्या बलात्काऱी खून्यांना फाशीच

ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय. बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती.

Sep 17, 2012, 09:14 PM IST

पुण्यात मुलीच्या हत्येचं गूढ

१६ वर्षांच्या शाळकरी मुलीची पुण्यात हत्या झालीय. पूजा जाधव असं या मुलीच नाव आहे. ही हत्या का आणि कशी झाली याचा खुलासा नं झाल्यानं ही घटना एक गूढ बनलीय.

Sep 10, 2012, 10:10 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की चाललंय काय?

राज्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण अडकल्याचं चित्र उभं राहिलंय. सोलापूरात राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं उघड झालंय.

Sep 6, 2012, 04:17 PM IST

भटक्या कुत्र्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sep 6, 2012, 02:36 PM IST

हप्तावसूलीसाठी रेल्वे पोलिसांची मुजोरी

मुंबईत वडाळा स्टेशनजवळ चार पोलिसांनी एका विक्रेत्याला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये हा विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Aug 27, 2012, 11:35 AM IST