crime

गोव्यात तालिबानी प्रकार, चोरीच्या आरोपात मुलांची नग्न धिंड

गोव्यातल्या कुडचडे इथं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इथल्या दोन मुलांना ‘काब दे रामा’ इथं नेवून (गावाचे नाव आहे ) चोरीच्या संशयावरुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजलीय. याबाबत स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केलीय, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.

Jun 2, 2014, 12:46 PM IST

महिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...

महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.

Apr 22, 2014, 04:54 PM IST

अमेरीकन `आई`ने केले सात बालकांचे `खून`

अमेरीका मधील उटाह राज्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने गेल्या दहा वर्षांत आपल्याच सात नवजात बालकांना ठार मारल्याची समोर आली आहे.

Apr 14, 2014, 06:17 PM IST

आझमींनी तोडले अकलेचे तारे, सून आयेशा टाकियाची टीका

बलात्कार प्रकरणांतील पीडितेलाही शिक्षा व्हायला हवी, असं धक्कादायक वक्तव्य करत अबू आझमींना आपल्या अकलेचे तारे तोडल्यानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकियाने ट्‌विटरवरून टीका केली आहे.

Apr 11, 2014, 05:19 PM IST

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार

पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.

Feb 17, 2014, 03:13 PM IST

पैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले

पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.

Feb 17, 2014, 02:54 PM IST

जबरी चुंबन पडले महाग, मुलीने तोडली जीभ

जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये

Feb 6, 2014, 11:00 AM IST

पुण्यात आयटी इंजिनियर्सची हुक्का पार्टी, ९ तरुणींचा समावेश

पिंपरी चिंचवडच्या हॉटेल टीम लूकमध्ये हुक्का पार्टी करणा-या आय.टी. कंपनीच्या ३१ कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.यामध्ये ९ तरुणींचाही समावेश आहे. पहाटेची गस्त सुरु असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अधारे ही कारवाई करण्यात आली.

Feb 2, 2014, 06:39 PM IST

गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?

आपल्या विनोदानं सर्वांच्या मनात घर करणा-या गुत्थी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोवरला हाच विनोद आता अडचणीत आणू शकतो...

Jan 21, 2014, 07:32 PM IST

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके

महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.

Jan 9, 2014, 11:28 PM IST

ठाणे पालिका राडा, सेना-भाजपच्या ५ जणांना अटक

ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Dec 26, 2013, 12:48 PM IST

ठाणे पालिकेत उपमहापौरांना चोपले, वरिष्ठांच्या भेटीनंतर नॉट रिचेबल

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर कालपासून नॉट रिचेबल आहेत. काल रात्री शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालिकेत राजकीय राडा पाहायला मिळाला.

Dec 24, 2013, 09:37 AM IST

समलिंगी संबंध : ‘प्रेम हा गुन्हा कसा होऊ शकतो?’

समलिंगी संबंध गुन्हेगारी कृत्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रमी कोर्टानं दिलाय. दिल्ली हायकोर्टानं समलिंगी संबंधांच्या बाजुनं दिलेला २००९चा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलाय.

Dec 11, 2013, 10:49 PM IST

पुण्याचे पोलीस आयुक्त पोळ यांना अटकेचे आदेश

पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गातल्या एका व्यक्तीशी संबंधित प्रकरणात आयोगाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Nov 25, 2013, 03:46 PM IST

चेन्नईत बंगळूर स्टाइल ATM हल्ला, महिलेची लूट

बंगळूरमध्ये एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला होण्याची घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चेन्नईमध्येही अशीची घटना घडली आहे. रेशनच्या दुकानात काम करणार्‍या एका महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन आणि १५ हजार रुपये दोन चोरट्यांनी पळविले.

Nov 25, 2013, 09:06 AM IST