dombivali

मनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक

 

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला आहे. 

केडीएमसी हा तर ट्रेलर आहे, मुंबई-ठाणेचा पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात शिवसैनिकांनी केडीएमसी विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 2, 2015, 04:48 PM IST

शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.

Nov 2, 2015, 04:25 PM IST

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.

Nov 2, 2015, 03:35 PM IST

...तर कल्याणमध्ये सत्तेच्या चाव्या मनसेकडे ?

कल्याण डोंबिवलीचे सर्व निकाल हाती आले असून यात कोणत्याही पक्षाला बहूमत मिळालेले नाहीत. शिवसेना 52 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला आहे तरी संपूर्ण बहूमत मिळविण्यात अपयश मिळाले आहे.

Nov 2, 2015, 03:23 PM IST

कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Nov 2, 2015, 02:38 PM IST

केडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी

कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.

Nov 2, 2015, 02:37 PM IST

उद्धव ठाकरे कल्याण- डोंबिवलीला जाणार

 कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण येथे जाणार आहे. 

Nov 2, 2015, 02:36 PM IST

दादरमध्ये शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची गर्दी

कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ गर्दी करत आहे. 

Nov 2, 2015, 02:21 PM IST

कडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल

राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

Nov 2, 2015, 08:52 AM IST