fight

सांगली ग्रामसभेत काठ्या-तलवारींनी हाणामारी

सांगली जिल्ह्यातील बनेवाडीच्या ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांचा वापर करण्यात आला.

Mar 4, 2013, 06:43 PM IST

सलमान करतोय मुंबईच्या `भूमिपुत्रांना` बेघर!

सलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.

Mar 3, 2013, 04:39 PM IST

काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी

नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच्या महिला सदस्याचे निलंबन केल्यामुळं हा गोंधळ घालण्यात आला.

Jan 16, 2013, 09:51 PM IST

विद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण

लातूर शहरातल्या श्री संत गोरोबा काका प्राथमिक शाळेत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी मुलांसमोर शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Jan 16, 2013, 04:09 PM IST

संमेलनावरून - राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय

कोकणात राजकीय पटलावर घडलंय-बिघडलंय हे नेहमीच नाट्य पाहायला मिळते. कोकणात वक्तृत्वावर पकड असलेल्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी हालचाल केली. पवारांच्या उपस्थित भास्कर जाधव समर्थकांसह राष्ट्रवादीत ढेरेदाखल झाले. तेथून कोकणात वाढणाऱ्या राष्ट्रवादीत ठिणगी पडली आणि राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय असं वातावरण निर्माण होवू लागलं. हे वातारण पक्ष वाढीला मारक ठरत आहे.

Dec 9, 2012, 06:19 PM IST

पोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!

मुंबईमध्ये युनिफॉर्ममधल्या पोलिसांवर हात उचलल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी काढलेल्या एका आदेशानुसार पोलिसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.

Oct 20, 2012, 09:01 AM IST

दबंग टायगरचे दबंग बॉडीगार्डस्...

आपली ‘दबंग’गिरी रिअल लाईफमध्येही दाखवून नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादात सापडणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण, या वेळेस स्वतःच्या चुकांमुळे नाही तर त्याच्या बॉडिगार्डच्या करामतींमुळं…

Oct 2, 2012, 03:18 PM IST

काँग्रेसने धर्मनिरपेक्षता शिकवू नये - NCP

झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत जुंपलीय. काँग्रेसनं आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलाय.

Mar 22, 2012, 06:47 PM IST

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

Feb 28, 2012, 09:57 AM IST

बस ड्रायव्हरला मारहाण

बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.

Feb 27, 2012, 07:58 AM IST

पद्मश्री नवाब सैफ अलीला जामीन

अभिनेता सैफ अली खानला जामीन मंजूर झाला आहे. काही वेळापूर्वीच त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यासाठी सैफला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली असती.

Feb 22, 2012, 09:44 PM IST