loksabha

पराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी

शरद पवारांनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना ट्रीटमेंटची गरज असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर आज भाजप नेते नितीन गडकरींनी टीका केलीय. मोदींवर पवारांनी केलेलं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांचा तोल सुटल्याचं गडकरींनी म्हटलंय.

Mar 31, 2014, 12:55 PM IST

मोदींच्या डोक्यावर परिणाम झाला - शरद पवार

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिणाम झालाय. आमची सत्ता आली की त्यांचा योग्य उपचार करू अशा शब्दात मोदींवर शरद पवारांनी टीका केली. ते जालना इथं बोलत होते.

Mar 31, 2014, 11:52 AM IST

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही- उद्धव

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Mar 31, 2014, 11:11 AM IST

पाडव्याच्या मुहूर्तावर आज पुण्यात `राज`गर्जना!

मनसेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटणार आहे. या प्रचाराची सुरुवातच पुण्यामधून होतेय. पुण्यामधील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील.

Mar 31, 2014, 10:36 AM IST

संवेदनशील मतदान केंद्रांची वेब कास्टिंगद्वारे पाहणी

ठाणे जिल्ह्यात यंदा प्रथमच वेबकास्टींग तंत्रज्ञानाद्वारे संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात येणार आहे.

Mar 30, 2014, 05:00 PM IST

विवाहितेने आत्महत्या नाही, खून झाल्याचा संशय

पुण्यातील विश्रांतवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

Mar 30, 2014, 04:59 PM IST

पुणे लोकसभा मतदारसंघात रेकॉर्डब्रेक उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक २९ उमेदवार आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणामध्ये आहेत

Mar 30, 2014, 04:58 PM IST

काँग्रेसचे सर्व नेते `आदर्श`, मोदींनी नांदेडमध्ये सुनावलं

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.

Mar 30, 2014, 04:20 PM IST

धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला

काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.

Mar 30, 2014, 12:29 PM IST

जसवंत सिंहांचं भाजपमधून ६ वर्षांसाठी निलंबन

जसवंत सिंह यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. राजस्थानमधल्या बारमेरमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.

Mar 30, 2014, 10:19 AM IST

सामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते

Mar 30, 2014, 09:14 AM IST

नवनीत कौर यांचा विरोध, खोडकेंचे हकालपट्टी

राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हाकलपट्टी केलीय. अमरावती इथ नवनीत कौर यांना उमेदवारी देण्यास खोडके यांचा विरोध होता.

Mar 29, 2014, 11:46 PM IST

वाईट भाषा ही काँग्रेसची संस्कृती नाही - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी इम्रान मसूद यांनी ६ महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींविषयी विधान केलं असल्याचं म्हटलंय. मात्र काँग्रेसची वाईट भाषा वापरण्याची संस्कृती नसल्यांचंही त्यांनी सांगितलंय. 

Mar 29, 2014, 11:43 PM IST

करोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र हजारीबाग मतदारसंघात 55 कोटी रूपये संपत्ती असलेले जयंत सिन्हा आणि 40 कोटी रूपयांची संपत्ती असलेली भाजपचे सौरव नारायण सिंह मैदानात आहेत,

Mar 29, 2014, 09:49 PM IST

राणे-राऊत कलगितूरा, कोकण विकास मुद्दा बाजुला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाला राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटलंय.

Mar 29, 2014, 12:34 PM IST