loksabha

मोदी धमकीने राहुल गांधींना धडकी, प्रचार दौरा रद्द

राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातील सरारानपूरच्या दौ-यावर जाणार होते मात्र मसूदवर झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधीना सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागलाय. मसूद हा काँग्रेसचा सहारानपूराचा उमेदवार आहे.

Mar 29, 2014, 11:56 AM IST

मतदानासाठी...मतदार राजाची `दिमाग की बत्ती`

निवडणुकांच्या हंगामात वारेमाप आश्वासनं द्यायची आणि निवडून आलं की, मतदारांकडं ढुंकूनही पाहायचं नाही, ही कला राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. मात्र त्यावर औरंगाबादच्या अंजनडोहच्या गावक-यांनी भन्नाट शक्कल शोधून काढलीय. केवळ तोंडी आश्वासनं नको, तर आश्वासनं पाळणार असं बॉण्ड पेपरवर लिहून दिल्यावरच या गावचे लोक आता मतदान करणार आहेत.

Mar 29, 2014, 10:22 AM IST

मोदींना धमकी, काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला अटक

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती.

Mar 29, 2014, 09:06 AM IST

राखी सावंतची राजकीय`राष्ट्रीय आम पार्टी`

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आयटम गर्ल राखी सावंतनं आता स्वतःचा नवा पक्षच काढलाय. राष्ट्रीय आम पार्टी या पक्षाची तिनं घोषणाच करून टाकली आहे.

Mar 29, 2014, 08:56 AM IST

सोशल मीडियावर सध्या पोलिटिकल वॉर

सोशल मीडियावर सध्या पोलिटिकल वॉर सुरू झालंय. तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय.

Mar 28, 2014, 10:13 PM IST

राष्ट्रवादी हा गळतीतून निर्माण झालाय - उद्धव ठाकरे

दक्षिण मुंबईतील परळमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Mar 28, 2014, 09:58 PM IST

नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mar 28, 2014, 12:37 PM IST

राज ठाकरेंच्या शहरी भागात सभांचा धडाका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ मार्चला पुण्यात होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेने शहरी भागात लोकसभेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेनेला डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत.

Mar 28, 2014, 12:05 PM IST

काँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली

मेरठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री नगमा यांनी अतिउत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. मेरठमध्ये सभेसाठी आलेल्या नगमा या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्या होत्या.

Mar 28, 2014, 11:24 AM IST

मेटेंना महायुतीत घेणार? सेना नेत्यांचा विरोध

शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना महायुतीसोबत घेऊ नये, असा शिवसेना नेत्यांचा कल असल्यानं आज मेटेंच्या मातोश्री भेटीचा आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातला सोहळा रद्द करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली.

Mar 27, 2014, 10:21 PM IST

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

Mar 27, 2014, 09:11 PM IST

शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार

ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.

Mar 27, 2014, 07:16 PM IST

नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज

बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.

Mar 27, 2014, 05:30 PM IST

मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.

Mar 27, 2014, 04:57 PM IST

सोशल मीडियावर पॉलिटिकल वॉर

सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालंय... तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय...

Mar 26, 2014, 10:15 PM IST