शिवसेनेचा प्रचार धडाका, उद्धव ठाकरेंच्या १९ सभा
शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका उद्यापासून पाहायला मिळणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात दिसणार आहे. राज्यभरात तसा दौरा आखण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचाराचेरणशिंग फुंकले आहे.
Apr 3, 2014, 12:44 PM ISTराणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक
कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.
Apr 3, 2014, 11:27 AM ISTराहुलची वरुण गांधीकडून स्तुती, भाजप अडचणीत
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. हा भाईचारा भाजपला अडचणीत आणणारा ठरलाय. वरुण यांनी आपल्या वडील भावाच्या अमेठीतील कामाची जाहीर स्तुती तर केलीच; पण आपण शब्द मागे घेणार नाही, असेही बजावले.
Apr 3, 2014, 09:13 AM ISTमनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Apr 3, 2014, 08:40 AM ISTगांधी परिवार आणि रायबरेली मतदारसंघाचं अतूट नातं
गांधी परिवार आणि रायबरेली मतदारसंघाचं अतूट नातं आहे. नेहरु आणि गांधी परीवाराच्या सत्तेची साक्षीदार असलेली रायबरेलीवर एक रिपोर्ट पाहूया.
Apr 3, 2014, 08:30 AM IST९ करोडपैंकी सोनियांनी राहुलला दिलं ९ लाखांचं कर्ज
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. आपल्याकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये असल्याचं सोनियांनी जाहीर केलंय.
Apr 2, 2014, 08:16 PM ISTसोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसभवनमध्ये होमहवन केल्यानंतर सोनिया यांनी आपला अर्ज दाखल केलाय. रायबरेलीच्या जनतेनं नेहमीच भरभरुन प्रेम दिल्याचं यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं.
Apr 2, 2014, 03:38 PM ISTस्मारकांच्या राजकारणापासून सावध राहा; राज ठाकरेंचा सल्ला
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जुन्नरमध्ये जाहीर सभा होतेय. या सभेत राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय.
Apr 1, 2014, 08:27 PM ISTऔकात दाखवाल तर गप्प बसणार नाही - उद्धव
औकात दाखवाल तर गप्प बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजला ठाकरी शैलीत सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
Apr 1, 2014, 07:05 PM ISTराष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप
कल्याणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतल्या ऑफिससमोर राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या कार्यकर्त्यांकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केलीय.
Apr 1, 2014, 11:26 AM ISTयुतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे
महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.
Apr 1, 2014, 10:04 AM IST`मनसे`मुळेच युतीत होता तणाव, उद्धव ठाकरेंची कबुली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेमुळेच काही काळ भाजपमध्ये आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता याची कबुली दिलीय. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग आज `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाशित झाला. या मुलाखतीच्या अखेरच्या भागात जनतेच्या मनातील ‘मनसे’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंतच्या अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
Apr 1, 2014, 09:32 AM ISTभाजपकडून राहुल गांधींविरोधात स्मृती इराणी रिंगणात
भाजपनं रायबरेलीतून सुप्रीम कोर्टाचे वकील अजय अग्रवाल यांना सोनिया गांधीच्या विरोधात मैदान उतरवलंय. त्यामुळे रायबरेली मतदार संघात सोनिया गांधी विरुध्द अजय अग्रवाल सामना रंगणार आहे. तर अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिलीय.
Apr 1, 2014, 08:50 AM ISTभाजपकडून जास्तच जास्त `आयारामां`ना उमेदवारी
भाजपकडून जास्तच जास्त आयारामांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये याबाबतीत अस्वस्थता वाढतांना दिसून येत आहे.
Mar 31, 2014, 10:03 PM ISTपाहा मतदानावर गुगल इंडियाचा अप्रतिम व्हिडीओ संदेश
गुगल इंडियाने भारत-पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर दोन मित्र कसे जवळ येतात, अशी एक जाहिरात बनवली होती ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.
Mar 31, 2014, 05:19 PM IST