एप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआय
आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांचं आता काऊंटडाऊन सुरु होणार आहे. कारण एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Jan 5, 2014, 04:58 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM ISTलोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM ISTमाझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी
देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
Oct 17, 2013, 06:34 PM ISTरिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी
महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.
Oct 4, 2013, 07:38 PM ISTपोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!
लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.
Aug 27, 2013, 08:21 PM ISTअन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
Aug 26, 2013, 11:16 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM ISTदेशात पहिली `महिला बँक`
देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.
Feb 28, 2013, 01:14 PM ISTमराठा आरक्षण लोकसभेत
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुढे आला आहे. आता थेट हा मुद्दा संसदेत गेला आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 8, 2012, 09:00 AM ISTइंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 5, 2012, 12:38 PM IST२०२८ पर्यंत लोकसभाचः सुप्रिया सुळे
आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय
Oct 16, 2012, 01:10 PM ISTसंसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार
मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.
Aug 14, 2012, 03:58 PM IST...आणि सोनिया गांधी भडकल्या
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.
Aug 9, 2012, 01:48 AM ISTकलमाडी लढणार पुन्हा लोकसभा
पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.
Jun 11, 2012, 08:29 PM IST