madhya pradesh

नरेंद्र मोदींची घणाघाती टीका, काय म्हणालेत मोदी?

२०१४ मध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या हितासाठी काँग्रेसने सीबीआयचा वापर केला आहे. देशाची वाट काँग्रेस सरकारमुळे झाली आहे, असे मोदी म्हणालेत.

Sep 25, 2013, 04:03 PM IST

नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?

मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. इथं नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेच्या निमित्ताने मोदी- लालकृष्ण अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

Sep 25, 2013, 11:55 AM IST

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

Sep 24, 2013, 07:47 PM IST

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं

मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.

Sep 6, 2013, 07:37 PM IST

आता मदरशांमध्ये शिकवावी लागणार भगवद् गीता!

मध्य प्रदेशात शिवराज यांच्या सरकारवर हिंदुत्व प्रसाराचे आरोप होत असतानाच सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाद उठला आहे. यापुढे मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही भगवद् गीता शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

Aug 5, 2013, 04:11 PM IST

सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज - काँग्रेस

मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेता मुखिया कांतीलाल भूरिया यांनी राष्ट्रीय स्वंय सेवक संघावर खळबळजनक आरोप केलाय. सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज असते. RSSचे कार्यकर्ते सुंदर आदिवासी मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, असा गंभीर आरोप केला आहे.

Jul 31, 2013, 12:53 PM IST

धर्मांतराची सक्ती पडणार महागात, ख्रिस्ती समूदाय नाराज!

यापुढे मध्य प्रदेशात धर्म परिवर्तनाचा आग्रह महागात पडणार आहे. सक्तीने धर्म परिवर्तन करवल्यास आधीच्या दंडापेक्षा दहापट दंड आणि एक वर्षाऐवजी चार वर्षं तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकतो. मात्र या गोष्टीला ख्रिस्ती धर्मसमुदायाने विरोध केला आहे.

Jul 11, 2013, 04:14 PM IST

नोकराचं लैंगिक शोषण; माजी अर्थमंत्री तुरुंगात!

नोकरांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे अर्थ मंत्री राघवजी यांना अगोदर आपलं पद गमवावं लागलं आणि आता त्यांना पोलीस कोठडीची हवाही खावी लागलीय.

Jul 9, 2013, 04:10 PM IST

आता गहू १ तर तांदूळ २ रूपये किलो दराने

जून महिन्यापासून गरिबांना आता १ रूपया प्रति किलो दराने तांदूळ तर २ रूपये किलो दराने गहू देण्यात येणार आहे. तसा निर्णय मध्यप्रदेशमधील शिवराज चौहान सरकारने घेतला आहे.

May 8, 2013, 03:53 PM IST

४ वर्षीय चिमरूडीवर अत्याचार, मृत्यूशी झुंज

एका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या सिवनीतल्या ४ वर्षीय चिमुरडीची प्रकृती आणखी नाजूक बनलीय.

Apr 23, 2013, 03:33 PM IST

पेपर कठिण गेल्याने १२वीतील मुलीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेपर कठिण गेल्याने या मुलीने घरी गेल्यानंतर फाशी लावून घेतली.

Mar 7, 2013, 03:08 PM IST

मोकाट लाचखोर

सरकारी अधिका-यांची लाच घेतल्याची प्रकरणं सतत उघडकीस येत असतात...तसंच सतत दुर्लक्षित होत असतात हे दिसून आलंय माहितीच्या अधिकाराखाली...

Feb 6, 2013, 11:21 PM IST

आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश

भोपाळमध्ये आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश झालाय. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक वसंत प्रताप सिंह यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकलाय. या छाप्यात तपास अधिका-यांच्या हाती मोठं घबाड लागलय.

Feb 6, 2013, 04:04 PM IST

‘तरुणींवर झालेले बलात्कार समजू शकतो...पण’

मध्यप्रदेशचे भाजप खासदार रमेश बैस यांना मोठ्या मुलींवर किंवा स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतात पण, लहान बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना मात्र फाशीची सजा व्हायला हवी, असं वाटतंय. पण, यामुळे मात्र ते चांगलेच अडचणीत आलेत.

Jan 10, 2013, 02:20 PM IST

`महिलांनी मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`

मध्यप्रदेशचे उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी दिल्ली बलात्कारावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. `मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

Jan 4, 2013, 01:19 PM IST