marathi

Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 8, 2018, 03:52 PM IST

रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींवर संतापल्या, माझ्यावर केली वैयक्तिक टीका

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांना हसण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे. 

Feb 7, 2018, 09:10 PM IST

INDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....

   भारतीय क्रिकेट संघ  परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे.  आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  सुरवातीला वाटले की  टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला. 

Feb 7, 2018, 08:23 PM IST

महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धाही रंगणार आहे.

Feb 5, 2018, 08:41 PM IST

राज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र

  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला. 

Feb 5, 2018, 08:19 PM IST

पतंजली बिस्किटांमध्ये सापडला मैदा, गुन्हा दाखल

पतंजलीच्या विविध प्रॉडक्टची सध्या भारतीयांमध्ये खूप क्रेज निर्माण झाली आहे. पतंजलीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. अशातच पतंजलीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.  पतंजली मैदा विरहित बिस्किटे असल्याची जाहीरात करीत असताना त्यात मैदा आढळून आल्याने पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 2, 2018, 07:35 PM IST

चहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर

  भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला. 

Feb 2, 2018, 06:24 PM IST

१९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

  गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे. 

Feb 2, 2018, 04:36 PM IST

viral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर

गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2018, 04:55 PM IST

ज्यू धर्मियांची मराठी संस्कृती!

भारत आणि इस्त्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहे. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्षे भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खुपच जुनं... या नात्याला नवी झळाळी लाभलीय ती इस्त्रायलच्या तांत्रिक टीमने तयार केलेल्या 'डीजी ठाणे' या अॅप्लीकेशनमुळे... भारत आणि इस्त्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट... 

Jan 27, 2018, 10:34 AM IST

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला, भाजपचे तिरंगा रॅलीने उत्तर

संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत संविधान बचाव रॅलीच्या बॅनरखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्या प्रजासत्तादिनी सर्व विरोधी पक्ष मिळून मुंबईत संविधान बचाव रॅली काढणार आहेत. १५ दिवसांपूर्वी विरोधकांनी या रॅलीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही या रॅलीला उत्तर देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे. उद्या मुंबईत या दोन्ही रॅलीने राजकीय वातावरण मात्र तापणार आहे.

Jan 25, 2018, 11:04 PM IST

अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये

  फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. 

Jan 25, 2018, 09:17 PM IST

धोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..

  टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.

Jan 25, 2018, 07:56 PM IST

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

Jan 25, 2018, 07:04 PM IST

आत्महत्येचा व्हिडिओ बनवून त्रास देणाऱ्या प्रियकराला पाठवला...

भंडारा जिल्ह्यातील एका मुलीचा साखरापुडा दुसऱ्या मुलाशी झाला असला तरीही तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत असल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन  केले असल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली.

Jan 24, 2018, 11:37 PM IST