mla

मंत्र्याविरुद्ध फेसबुक पोस्ट; पत्रकाराला जिवंत जाळलं

एका मंत्र्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार लखनऊमध्ये घडलाय. 

Jun 9, 2015, 03:06 PM IST

भाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.

Jun 2, 2015, 09:48 AM IST

पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन

पालघरचे  शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.  रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे. 

May 24, 2015, 09:24 AM IST

दिल्लीत 'आप'चा आमदार फरार घोषित

 आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

May 5, 2015, 01:34 PM IST

भाजप आमदारला दोन वर्षांच्या कारावास

भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांच्या कारावास आणि अडीच हजार रूपये दंड अशी शिक्षा झालीय. 

Apr 24, 2015, 10:01 PM IST

... जेव्हा आमदार संरपंचाच्या बायकोला ठरवतात 'वेश्या'!

एका आमदार महाशयांना मॉरल पोलिसिंग करण्याची हुक्की आली... आणि त्यांनी पोलिसांना हाताशी धरलं... त्यातूनच एका हॉटेलवर छापा पडला... पण डोंगर पोखरुन उंदीर निघाला. 

Apr 22, 2015, 12:32 PM IST

मीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.

Apr 11, 2015, 01:05 PM IST

निवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक

काँग्रेसच्या आमदाराला अटक

Apr 6, 2015, 10:30 AM IST

भाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.

Mar 22, 2015, 06:51 PM IST

टोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायलाही लोकप्रतिनिधींना वाटतेय लाज!

सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.

Mar 20, 2015, 06:01 PM IST

आमदार प्रताप सरनाईकांना पुजारी टोळीकडून धमकी

ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे ठाण्यात कायदा सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Mar 11, 2015, 09:55 PM IST

'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.

Mar 11, 2015, 08:51 PM IST

शेतकऱ्यांना मदत द्या, विरोधकांची सरकारकडे मागणी

दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं. 

Mar 9, 2015, 11:48 AM IST