वाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे
लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.
Mar 20, 2013, 11:13 PM ISTआमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Mar 20, 2013, 05:47 PM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTकुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.
Mar 20, 2013, 04:31 PM ISTपोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
Mar 20, 2013, 03:21 PM ISTराम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
Mar 20, 2013, 08:43 AM ISTमी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTदोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर
विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितीज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTका मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.
Mar 19, 2013, 05:50 PM ISTआमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM ISTया आमदारांनी केली पोलिसांना मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?
Mar 19, 2013, 04:29 PM ISTविधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
Mar 19, 2013, 01:51 PM ISTराज ठाकरेंचा `राम` चीनमध्ये
मनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते.
Mar 12, 2013, 04:16 PM ISTमनसे आमदाराच्या मुलाचा शाही विवाहसोहळा...
शाही विवाह सोहळे महाराष्ट्रात चांगलेच रंगू लागले आहेत. कृषीमंत्री शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते शाही सोहळे करण्यातच मग्न आहेत.
Feb 19, 2013, 09:20 AM ISTमुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ
मुंबईतल्या विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील एकमेकांना भिडले.
Feb 12, 2013, 05:06 PM IST