rain

यावर्षी जोरदार पाऊस, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पसरणार

केरळात मान्सून दाखल  झालाय. येत्या १० ते १२ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. राज्यात येत्या २ ते ४ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 27, 2017, 04:02 PM IST

Good News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

पावसासाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

May 26, 2017, 07:20 PM IST

नाशिक जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पाऊस, चार ते पाच जनावरांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला. 

May 25, 2017, 09:39 PM IST

मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय. 

May 24, 2017, 07:22 PM IST

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.

May 16, 2017, 08:26 AM IST

मान्सून लवकरच अंदमानात दाखल होणार

राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

May 14, 2017, 10:40 AM IST

मे महिन्यात शिर्डी, सातारा, कोकणातही पावसाची हजेरी

यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्रात हजेरी लावलीय. यामुळे, उन्हानं हैराण झालेल्यांना वातावरणानं थोडा थंडावा अनुभवायला मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र झोप उडालीय.

May 13, 2017, 07:49 PM IST

पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडीत, धुळे शहर अंधारात

शहरात काल जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धे धुळे शहर अंधारात होते.

May 13, 2017, 11:48 AM IST

धुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका

धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.

May 13, 2017, 11:35 AM IST

मुंबईकरांना पावसाचा दिलासा, मेघगर्जनेसह हजेरी

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं थोडा दिलासा मिळाला आहे. विकेंडला बरसणा-या पावसानं मुंबईत थोडा गारवा निर्माण झालाय.

May 13, 2017, 11:23 AM IST

अंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय. 

May 11, 2017, 08:14 AM IST

लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा

वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

May 11, 2017, 07:55 AM IST