बस आली धावून...
जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Jul 20, 2012, 05:46 PM ISTगेल्या वर्षीही ६० मोटरमनने केला होता संप!
गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.
Jul 20, 2012, 04:41 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत.
Feb 6, 2012, 08:58 AM ISTपश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक
घेण्यात येणार आहे.
उद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.
Feb 4, 2012, 09:29 PM ISTरेल्वे स्टेशन नाही उणे, त्यावर सरकते जिने
मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे.
Jan 20, 2012, 10:23 PM ISTचर्चगेट ते डहाणू रोड थेट लोकल नाही- पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते डहाणू रोड अशी थेट लोकल ट्रेन सुरू करणं शक्य नाही, असं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
Jan 18, 2012, 11:08 PM ISTमृत्यूच्या दिशेने भरधाव नेणारा रेल्वे ट्रॅक
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील अपघातात २०११ साली १६० लोक मृत्यूमुखी पडली तर १७३ जण जखमी झाल्याचं रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Jan 11, 2012, 03:08 PM IST'ब्लॉक' करणार मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'....
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत.
Dec 18, 2011, 05:48 AM ISTखार सबवे मृत्युचा सापळा
पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं.त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.
Nov 29, 2011, 06:45 AM ISTपश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेने ट्रॅक्शन नेटवर्क डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेटिंग करंट) बदलण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. बांद्रा ते भाईंदर दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० दरम्यान रेल्वेसेवा पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. विलेपार्ले ते बोरिवली दरम्यान टॅक्शन नेटवर्कच्या कामासाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Nov 11, 2011, 05:00 PM IST