कोल्हापूर: कोल्हापूरच्या शिरोली गावचे सरपंच शशिकांत खवरे यांनी हवेत गोळ्या झाडून दिवाळी साजरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त गुरुवारी संध्याकाळी याठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खवरे यांनी उत्साहाच्या भरात आपल्याकडील डबलबारी बंदुकीने हवेत गोळीबार केला. यामुळे वाद निर्माण झाला असून पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सगळे फटाके उडवत असताना अचानक सरपंच खवरे यांनी पिस्तूल लोड करुन थेट हवेत गोळीबार केला. सुरुवातीला डबलबारी बंदूक आणि त्यानंतर पिस्तूलमधून हवेत गोळ्या झाडल्या. शशिकांत खवरे यानी हवेत गोळीबार केलेला व्हिडिओ व्हायरल झाला. आता सरपंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला.