अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

Congress Leader Ashok Chavan PC 21 Feb 2023

VIDEO | अशोक चव्हाणांची पोलिसांत तक्रार

Congress Leader Ashok Chavan PC 21 Feb 2023

Feb 21, 2023, 16:35 PM IST
Ashok Chavan : आधी झळकली बॅनरवर, आता अशोक चव्हाण यांची मुलगी राहुल गांधींसोबत यात्रेत

Ashok Chavan : आधी झळकली बॅनरवर, आता अशोक चव्हाण यांची मुलगी राहुल गांधींसोबत यात्रेत

Ashok Chavan : काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात( Bharat Jodo Yatra) श्रीजया अशोक चव्हाण (Srijaya Ashok Chavan) या सहभागी झाल्यात. आधी श्रीजया यांचे नांदेडमध्ये बॅरन झळकले होते. 

Nov 08, 2022, 15:03 PM IST
चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात, जाणून घ्या देशाचं गृहमंत्री, मुख्यमंत्रिपद भूषवणारं कुटुंब आहे तरी कोण?

चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात, जाणून घ्या देशाचं गृहमंत्री, मुख्यमंत्रिपद भूषवणारं कुटुंब आहे तरी कोण?

चव्हाण कुटुंबाची एकूण तिसरी पिढी ही राजकारणात (Maharashtra Politics) पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय आहे.

Nov 04, 2022, 17:07 PM IST
Ashok Chavan: चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या बॅनरचीच चर्चा

Ashok Chavan: चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या बॅनरचीच चर्चा

Maharashtra Political Update : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव

Nov 04, 2022, 15:13 PM IST
भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, अशोक चव्हाणांचा वॉक, नानांचा पुशअप्सचा सराव

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, अशोक चव्हाणांचा वॉक, नानांचा पुशअप्सचा सराव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार

Nov 02, 2022, 18:48 PM IST