रिचा चढ्ढासोबतचा सेल्फी टाकत अली म्हणतो...

अली फजलने अखेर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत होत असलेल्या गॉसीपविषयी मोठा खुलासा केला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2017, 11:17 PM IST
रिचा चढ्ढासोबतचा सेल्फी टाकत अली म्हणतो... title=
मुंबई : अली फजलने अखेर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत होत असलेल्या गॉसीपविषयी मोठा खुलासा केला आहे. बर्याच काळापर्यंत दोघांचे नाव जोडले जात होते. त्या दोघांची बातमी झपाट्याने सुरू होती. 
अलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. "माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक..आहे तर आहेच" असे हा फोटो शेअर करताना अलीने लिहिले.
 

One of my favourite pictures. है तो है ।

A post shared by ali fazal (@alifazal9) on

 
शेअर केलेले हा एक सुंदर सेल्फी आहे. अलीने यात थेट काहीही लिहिले नसले तरीही इशाऱ्यातून चित्र स्पष्ट केल्याची सगळीकडे चर्चा आहे. 
दोन दिवसांपूर्वी दोघांना वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये अली आणि रिचा चड्डाला  एकत्रित पाहिले होते. तेव्हा रिचानेही एक फोटो शेअर केला होता. याची सुरूवात फुकरे च्या सेटवर झाली. लवकरच हे दोन स्टार्स 'फुकरे रिटर्न्स' चित्रपटात दिसणार आहेत.