'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2018, 02:36 PM IST
'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खानने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिलेय. अरबाजने आपला गुन्हा कबुल केलाय. आपण सट्टेबाज सोनु जालान याला ओळखतो. तसेच मी बेटिंग केलेय. यात मला मोठे नुकसान झालेय, असे तो म्हणाला. या सट्टेबाजीमुळे अरबाज आणि मलायका अरोरा यांच्यात दुरावा निर्माण झाला. अरबाजच्या सट्टा लावण्याच्या सवयीमुळे वैतागून त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला होता. अरबाज नेहमी सट्ट्यात हरायचा. यात त्याला मोठे नुकसानही झाले आहे. मलायकाने सांगूनही तो ऐकत नव्हता. शेवटी कंटाळून मलायकाने घटस्फोट घेतला. यात सलमानची मध्यस्ती उपयोगी झालेली नाही. कारण अरबाजने सलमानचेही ऐकले नाही.

अरबाजला सट्टेबाजीप्रकरणी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार अरबाज ठाणे पोलिसात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत बॉडीगार्ड शेरा उपस्थित होता. त्याआधी त्याने सलमान खानची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. याआधी या प्रकरणातील बुकी सोनू जालान याला अटक केली आहे. त्याने चौकशीत अरबाज खानचे नाव घेतले. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आलेय. अनेक बॉलिवूड स्टार यात गुंतल्याची माहिती आहे. दरम्यान, चौकशीत अरबाज सांगितले की, मी सहा वेळा बेटिंग केले आहे. अरबाज यांने कबुल केले की आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यातही त्याने सट्टेबाजी केली होती. गेल्या वर्षीही त्याला २.७५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

आयपीएलमध्ये सट्टेबाजीप्रकरणी सोनूचा मुलगा यालाही अटक करण्यात आलेय. त्याचे काही माफिया लोकांशी संबंध असल्याचे समजत आहे. यामध्ये त्यात दाऊद इब्राहिम कासकर यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले निरीक्षक राजकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा तपास गेल्या पाच-सहा वर्षांपासून चालू आहे आणि ५०० ​​ते ६०० कोटींच्या गैरव्यवहाराची एक घोटाळा होण्याची शक्यता आहे. 

राजकुमार म्हणाले की, सोनूकडून काही छायाचित्र आणि व्हिडिओ हाती मिळाले आहेत. ज्यामध्ये इतर मोठ्या चित्रपटांच्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात, त्यांना समन्स देखील पाठविले जाऊ शकतात. पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्या मते, आयपीएलच्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि नवी दिल्ली येथून सट्टेबाजांची नावे आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीझन दरम्यान बुकी सोनू जालानच्या अटकेनंतर हा गौप्यस्फोट झाला आहे. अरबाज खान साधारण ३ कोटी रुपये सट्टेबाजीत हरल्याची चर्चा आहे. आयपीएल २०१६ च्या सीझनमधील २ मॅचमध्ये सावळा गोंधळ झाल्याचा पोलिसांना संशय आहे. व्यावसायिक हनीफ खान, बुकी सोनू आणि अरबाज खान यामध्ये मध्यस्थी असल्याचे कळते. 

दहा वर्षांपूर्वी आयपीएलच्या घोटाळ्याचा खटला उघडकीस आला आणि सोनूला अटक झाली. या चौकशी दरम्यान, हे उघड झाले की ते अरबाजच्या नावासह जगातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या संपर्कात आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विंदू दारा सिंग सोनू जालानला भेटले पण ते आयपीएलच्या जुन्या केसशी संबंधित होते. ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रतिबंध शाखेने (AEC) १५ मे रोजी याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी सोनू जालान ऊर्फ सोनू मलाड याच्यासहीत चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. जालानला देशाच्या सर्वोच्च बुकींमध्ये गणले जाते.  वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान जालान आणि अरबाज यांच्यातील "संबंध" आढळून आले.