प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली

Kriti Sanon on dating Prabhas : झगमगत्या विश्वात पुन्हा एका कपलची चर्चा... प्रभास आणि क्रिती यांच्या नात्याला मिळणार नवं वळण; अभिनेत्रीची एक पोस्ट आणि सर्व सत्य चाहत्यांसमोर   

Updated: Nov 30, 2022, 03:17 PM IST
प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली title=

Prabhas and Kriti Sanon : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) 'आदिपुरुष'  सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान सिनेमाची शुटिंग सुरू असताना प्रभासने क्रितीला प्रपोज केलं असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यामुळे प्रभास-क्रिती (prabhas kriti sanon) खंरच एकमेकांना डेट करत आहेत का? दोघं त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करणार का? लग्न कधी करणार? असे अनेक प्रश्न प्रभास आणि क्रितीला विचारण्यात आले. आता रंगणाऱ्या सर्व चर्चांवर खुद्द क्रितीने पूर्णविराम दिला आहे. 

क्रितीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर चाहत्यांच्या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. 'ना प्रेम ना कोणत्याही प्रकारचं पीआर.... आमचा 'भेडिया' (वरुण धवन) रिऍलिटी शोमध्ये तुफान wild झाला. त्याने केलेल्या मजेशीर गोष्टींमुळे अनेक अफवा पसरत आहेत...' (kriti sanon prabhas love)

क्रिती पुढे म्हणाली, 'काही पोर्टल माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधी मला एक घोषणा करायाची आहे. याठिकाणी मी तुमचा गैरमसज दूर करते. या फक्त अफवा आहेत. यामध्ये तथ्य  काहीही नाही..' असं म्हणत क्रितीने प्रभाससोबत रंगणाऱ्या रिलेशनशिप आणि लग्नाच्या चर्चांना पूर्ण विराम दिलं आहे. (kriti sanon net worth)
 
क्रितीने प्रभासबद्दल केलंलं वक्तव्य
'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan) शोमध्ये क्रितीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. शोमध्ये क्रितीने प्रभासबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या. एवढंच नाही तर एका मुलाखतीत अभिनेत्रीने प्रभाससोबत लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. ज्यामुळे दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. (kriti sanon wants to marry prabhas)

क्रिती आणि प्रभासचे सिनेमे 
प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच (Adipurush) 'आदिपुरुष'मध्ये एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर टीझर विरोधात जोरदार  टीका झाली आहे. (prabhas and kriti sanon relationship)

व्हीएफएक्सपासून ते कलाकारांच्या लूकपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, जे चाहते सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना अजून थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण सर्वात आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शीत होणार आहे. (kriti sanon relationship)