राणी मुखर्जी सिनेमा प्रमोशनसाठी आली आणि शोच्या सेटवरुन ती तडक निघून गेली!

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचकी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतेय.ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करीत आहे.  तिचा जवळचा मित्र करण जोहर याच्या शोमध्येही प्रमोशन करण्यासाठी राणी पोहोचली खरी मात्र अचानक ती शोच्या सेटवरुन निघून गेली. का निघून गेली राणी?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 6, 2018, 02:54 PM IST
राणी मुखर्जी सिनेमा प्रमोशनसाठी आली आणि शोच्या सेटवरुन ती तडक निघून गेली!

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिचकी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतेय.ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करीत आहे.  तिचा जवळचा मित्र करण जोहर याच्या शोमध्येही प्रमोशन करण्यासाठी राणी पोहोचली खरी मात्र अचानक ती शोच्या सेटवरुन निघून गेली. का निघून गेली राणी?

निर्माता- दिग्दर्शक आणि निवेदक करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीनं नुकतीच हजेरी लावली. या शोच्या सेटवर पोहोचल्यानंतर अचानक राणी तेथून निघून गेली. राणीच्या या EMERGENCY EXITचं कारण काय, असं काय घडलं की राणी अचानकपणे करणचा शो सोडून निघून गेली, असा प्रश्न यावेळी सगळ्यांना पडला होता.

राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेला 'हिचकी' हा सिनेमा प्रमोट करायला राणी करण जोहरच्या या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेली होती. पण शोचं शूटींग अर्ध्यातूनच सोडून राणी निघून गेली. राणी शूट सोडून का गेली या गोष्टीवरुन अखेर पडदा उठला आहे.

राणी मुखर्जीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तिला हा शो सोडून जावं लागलं. खरंतर या शोमध्ये राणी करण जोहरसोबत अनेक रोमॅण्टिक गाण्यांवर परफॉर्म करणार होती. मात्र तसं काहीच घडलं नाही. आपल्या 'हिचकी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या सेटवर आलेल्या राणीला पाठदुखीच्या समस्येमुळे तातडीनं डॉक्टरोकडे घेऊन जावं लागलं. 

निर्माता करण जोहर आणि राणी मुखर्जी यांच्यातील मैत्री फारच जुनी आहे. राणीनं करणच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय.. कुछ कुछ होता है, कभी खूशी कभी गम, कभी अलविदा न कहना अशा अनेक चित्रपटांमध्ये राणीनं महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.