रणवीरच्या 'सिंबा'चे पोस्टर प्रदर्शित...

पद्मावतीचा वाद चिघळला असून तो चित्रपट कधी प्रदर्शित होईल, सांगता येत नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 7, 2017, 10:56 AM IST
रणवीरच्या 'सिंबा'चे पोस्टर प्रदर्शित... title=

नवी दिल्ली : पद्मावतीचा वाद चिघळला असून तो चित्रपट कधी प्रदर्शित होईल, सांगता येत नाही.

नव वर्षात रणवीर नव्या अवतारात

मात्र त्या वादात न अ़डकता अभिनेता रणवीर सिंगने पुढच्या कामाकडे लक्ष केद्रींत केले आहे. नव वर्षात रणवीर आपल्याला 'सिंबा'च्या अवतारात दिसेल. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहर आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच निर्माते म्हणून एकत्र येत आहेत. 

पोस्टर सोशल मीडियावर शेअर

या पोस्टरमध्ये रणवीर सिंगचा एक वेगळाच अंदाच पाहायला मिळत आहे. पोलीसाच्या भुमिकेत दिसणार रणवीरचा उत्साहाने भरलेला अवतार पहायाला मिळत आहे. चेहऱ्यावरील भाव काहीसे मिष्किल दिसत आहेत. खऱ्या आयुष्यातही तो तसाच उत्साही आणि नटखट आहे. सिंबा चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याने पोस्टमध्ये लिहीले,  'संग्राम भालेराव अका सिम्बा'. 

ranveer singh

प्रेक्षक उत्सुक

रोहीत शेट्टीच्या 'सिंघम'मधील अजय देवगणची भुमिका चांगलीच गाजली. त्यात त्याने कडक आणि दमदार पोलीस ऑफिसर साकारला. आता रणवीर सिंगची पोलीसाची ही भुमिका कशी असेल, याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. 

 हे आहे गुपीत

हा चित्रपट पुढच्या वर्षी २८ डिसेंबरला प्रदर्शित होईल. साऊथच्या 'टेम्पर' चित्रपटाचा हा रिमेक आहे. मात्र यात नायिकेच्या भुमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार, हे गुपीत ठेवण्यात आले आहे.