Health News : कॉफीचं नाव ऐकताच त्यातून मिळणाऱ्या उर्जेचं स्मरण अनेकांना होतं. कॉफी पिताच ताजेपणा वाटू लागतो. अनेक अहवालांमध्ये, कॉफीचं अतिसेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं वर्णन केलं जातं. मात्र, कॉफी पिण्याचे अनेक फायदे (Coffee Benefits) आहेत. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही कॉफीचा उपयोग होतो. त्यामुळे अनेकजण कॉफीला प्राधान्य देतात.
रोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्यामुळे मधुमेहाचा धोका सुमारे 50 टक्के कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. कॉफी शरीराला उत्तेजित करण्याचे काम करते. त्यामुळे अनेक वेळा रात्रभर अभ्यास करताना कॉफी पिण्यास प्राधान्य दिले जाते. जगभरातील लोक दररोज सुमारे 2.25 अब्ज कप कॉफी पितात. काही अभ्यासांमध्ये, संशोधकांना असं आढळून आलंय की जर कॉफीचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर ते अनेक गंभीर आजारांसाठी फायदे ठरू शकतंय.
सकाळी कॉफीचं सेवन केल्याने त्याला आरोग्याला फायदा होतो. कॉफीमध्ये असलेले हे पोषक तत्व मानवी शरीराला विविध प्रकारे फायदेशीर ठरू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अनेक आजारांची तीव्रता कमी करण्यासाठीही याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं (HEALTH TIPS).
संशोधकांना असं आढळून आलंय की जे लोक 4 वर्षांहून अधिक काळ दररोज किमान एक कप कॉफी पितात त्यांना टाईप-2 मधुमेहाचा धोका 11 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मात्र, मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावे.
कॉफीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. यापूर्वी 2015 मध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये केलेल्या एका अभ्यासात, संशोधकांना असं आढळून आलंय की दररोज दोन ते तीन कप कॉफीचे सेवन केल्याने सहभागींना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि तीव्र यकृत रोग होण्याचा धोका 38 टक्के कमी होतो.
कॅफीनच्या सेवनाने रक्तदाबासह हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो. 2018 च्या अभ्यासात, दोन कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो. दररोज एक ते तीन कप कॉफी प्यायल्याने हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी होतात, असं तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, कॉफीमुळे त्वचाही चांगली होते. अनेकवेळा कॉफीचा स्क्रब म्हणून वापर केला जातो. याशिवाय फेसपॅकमध्येही कॉफीचा वापर केला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)