पाटणा: लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तेज प्रताप यांनी शिवरुप धारण केलेले दिसत आहे. कपाळ आणि अंगाला भस्म फासलेल्या अवस्थेतील त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच गाजत आहे.
श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधून त्यांनी काल शिव मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. यावेळी त्यांचा लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. तेज प्रताप यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. यानंतर काहीवेळातच हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. यापूर्वीही तेज प्रताप यादव यांनी अशाप्रकारचा वेष धारण केला होता.
मोदींनीही घेतली होती तेज प्रताप यांच्या कृष्णरुपाची दखल
काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादव यांनी एका गोशाळेत जाऊन बासरी वाजवली होती. तेव्हा अनेकांनी त्यांना कन्हैया म्हणायाला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची दखल घेतली होती.
तेज प्रताप यादव यांना अनेक कला अवगत आहेत. ते घोडस्वारी करतात, क्रिकेट खेळतात, याबरोबरच शंख आणि बासरीही वाजवतात. अध्यात्माकडे त्यांचा ओढा अधिक आहे.
Bihar: Lalu Prasad Yadav's elder son, Tej Pratap Yadav, dressed as Lord Shiva, offered prayers at a temple in Patna, today. pic.twitter.com/mMjuCydClz
— ANI (@ANI) July 23, 2019