पद्मावती चित्रपटाच्याविषयी मुख्यमंत्री योगी यांची कठोर भूमिका जाहीर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त पद्मावती चित्रपटाच्याविषयी कठोर भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांवर कारवाईसोबतच जे लोकभावना दुखावतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2017, 05:22 PM IST
पद्मावती चित्रपटाच्याविषयी मुख्यमंत्री योगी यांची कठोर भूमिका जाहीर  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त पद्मावती चित्रपटाच्याविषयी कठोर भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांवर कारवाईसोबतच जे लोकभावना दुखावतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतलीय. 

प्रदर्शनाच्या तारखा लांबवण्याची मागणी 

उत्तर प्रदेश सरकारनं केंद्र सरकारकडे पद्मावतीच्या प्रदर्शनाच्या तारखा लांबवण्याची मागणी केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असं उत्तर प्रदेश सरकारच्या विनंती पत्रात कळवण्यात आलं होते. त्यानंतर पद्मावतीची रिलीज डेट निर्मात्यांनीच पुढे ढकलली आहे.